Home » मुंबई » अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मंत्रिमंडळाच्या बैठकीतून पडले बाहेर

अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मंत्रिमंडळाच्या बैठकीतून पडले बाहेर

अशोक-चव्हाणांना-दुसऱ्यांदा-कोरोनाची-लागण,-मंत्रिमंडळाच्या-बैठकीतून-पडले-बाहेर

Home /News

/mumbai

/

BREAKING : अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लगेच पडले बाहेर

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

मुंबई, 27 जानेवारी : राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट धडकली आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी संकट मात्र कायम आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना कोरोना लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, अशोक चव्हाण हे कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट येताच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून चव्हाण बाहेर पडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते. बैठक सुरू असताना अशोक चव्हाण यांचा रिपोर्ट हाती आला. त्यामुळे  बैठक सुरू असताना चव्हाण कॅबिनेट बैठकीमधून निघून गेले. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. अशोक चव्हाण हे नांदेडमधून मुंबईला उपचारासाठी दाखल झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. राज्यातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यातल्या काही मंत्री आणि नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.