Home » मुंबई » Alert..! हवेचा दर्जा धोकादायक, मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली

Alert..! हवेचा दर्जा धोकादायक, मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली

alert.!-हवेचा-दर्जा-धोकादायक,-मुंबईतील-हवेची-गुणवत्ता-पातळी-खालावली

मुंबई, 24 जानेवारी: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा परिणाम (Dust Storm In Pakistan) दिसून येत आहे. राज्यातील वातावरणात धुळीचे कण मिसळले. काल सकाळपासून मुंबईतील (Mumbai) आणि आजूबाजूच्या शहरांतील दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत पाऊस पडला. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागात हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. काल सकाळपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचले आणि त्यामुळे दृश्यमानता कमी झाली. रविवारी मुंबईत गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात 6 ते 7 अंशांनी कमाल तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यभर हुडहुडी..! पुढील 3 ते 4 दिवस गारठा कायम; मुंबईतही सर्वाधिक थंडी  कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 23.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 6 आणि 7 अंशांची घट झाली. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. नोंदवण्यात आलेलं तापमान गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे 21.6 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 21 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मालाड येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 436 म्हणजेच तीव्र प्रदूषण या श्रेणीत होता. भांडूप येथे 336, माझगाव येथे 372, वरळी येथे 319, वांद्रे कुर्ला संकुल येथे 307, चेंबूर 347, अंधेरी 340 असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. Corona Recover: कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर काळजी नको; या पद्धतींनी घरीच व्हाल ठणठणीत बरे पाकिस्तानमधील कराचीमध्ये धुळीचं वादळ आलं होतं. या वादळाचा परिणाम राज्यातल्या हवेवर झाला. त्यामुळे वातावरणात काल सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून आला.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Air pollution, Mumbai, Weather update

Leave a Reply

Your email address will not be published.