Home » Uncategorized » 'शिंदे साहेब आपल्या लोकांना नातं जपायला सांगा', आव्हाडांकडून नाराजी व्यक्त

'शिंदे साहेब आपल्या लोकांना नातं जपायला सांगा', आव्हाडांकडून नाराजी व्यक्त

'शिंदे-साहेब-आपल्या-लोकांना-नातं-जपायला-सांगा',-आव्हाडांकडून-नाराजी-व्यक्त

बहुप्रतिक्षित कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवाद उघडपणे बघायला मिळाला.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  ठाणे, 15 जानेवारी : बहुप्रतिक्षित कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा (Kharegaon flyover bridge) लोकार्पणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील श्रेयवाद उघडपणे बघायला मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते श्रेयवादाच्या घोषणाबाजी करताना दिसले. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील भर कार्यक्रमात भाषण करताना ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांना टोला लगावला. जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? आता कुठेही उडी मारली तरी महाविकास आघाडीतच गेलात ना? असं जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणाच्या सुरुवातीला एका माजी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला उद्देशून म्हणाले. “मला निधी मागायला कधीच जावं लागलं नाही. आम्ही राजकारणापलिकडे मित्र आहेत. श्रीकांत शिंदे तुम्ही वडिलांना चुपचाप विचारा सत्य कळेल. उड्डाणपुलाचा विकास कोणी केला याचा पाठपुरावा कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे. कळव्यात एकही खड्डा नाही, एकवेळ ठाण्यात असेल. तुम्ही पाठपुरावा केला मी हे कधीच बोलत नाही. श्रीकांत शिंदे आमच्यात अबोल मैत्रीचा धागा आहे तो कायम ठेवला पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. हेही वाचा : Video : लतिकाच्या सौंदर्याचा वजनदार मामला, अभिनेत्रीचा मनात भरणारा लुक ‘शिंदे साहेब आपल्या लोकांना नातं जपायला सांगा’ “महाविकास आघाडीचे पोस्टर लावले असते तर आम्हाला परत पोस्टर लावावे लागले नसते. चाणक्य आहात नारादमुनी होवू नका”, अशा शब्दांत आव्हाड यांनी ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांना चिमटा काढला. “मनपावर शिवसेनेची सत्ता आहे. निधी त्यांनी दिलाय हे सर्वांना माहिती आहे. मी शिंदे साहेबांबद्दल काही बोललो तर लोकांना आश्चर्य वाटेल, आमची मैत्री जुनी आहे. आमच्या मैत्री बद्दल कोणाला काहीच माहिती नाहिय. शिंदे साहेब आपण जे नातं ठेवलंय ते आपल्या लोकांना जपायला सांगा”, असं जितेंद्र आव्हाड भर कार्यक्रमात म्हणाले. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? “विकासासाठी निधी देण्याचं काम माझच होतं. मी कधीही दुजाभाव केला नाही. कोणत्या मतदारसंघात आमदार, नगरसेवक कोण आहे ते कधीच बघितलं नाही. आपल्याला माहिती आहे या ठाणे महापालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. शिवसेना प्रमुखांचं या ठाण्यावर उदंड प्रेम आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यावर प्रेम केलं. ठाण्याला विकासाच्या दिशेला नेण्याचं काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आपण नाव घेतलं. शरद पवार आमचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होते तेव्हा ढोकाळीच्या स्टेडियमला शरद पवार यांचं नाव देण्याचा विषय आला. आम्ही क्षणाचा विलंब न लावता त्यांचं नाव द्यायला सहमती दिली. शरद पवार देशाचे नेते आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. हेही वाचा : अंतर सांगणारे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांनी का रंगवलेले असतात? जाणून घ्या… “आम्ही राजकारणात राजकीय मतभेद नेहमीच बाजूला ठेवले आहेत. नगरसेवक कमी आहेत, त्यांचे नगरसेवक निवडून येतील, यासाठी विकास थांबवा, असं कधीही केलं नाही. उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय. नगरविकास सारखं महत्त्वाचं काम माझ्याकडे आहे. गृहनिर्माण सारखं महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आहे. बीडीडी चाळीसारखे निर्णय आपण घेताय. कितीतरी वर्षांपासून हे मुद्दे प्रलंबित आहेत. आपण किततरी अमुलाग्र बदल केले. कितीतरी क्रांतीकारी निर्णय घेतले. ते विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. मेट्रोचा विषय असेल, पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला ठाण्यात आणणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी आम्ही ठाण्यात घेराव घातला होता. तुम्हीदेखील होतात. आपण विकासाच्या बाबतीत कधीही कोणतं राजकारण केलं नाही. हा आव्हाडांचा मतदारसंघ आहे, तिथे काम थांबावा असं कधीही केलं नाही. आकडेवारी तर तुमच्यासमोर आहे. महापौर हे सगळ्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राग धरण्यासारखं नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. वरती काय ठाण्यात पण आघाडी होणार. तुमच्या लोकांनी मिशन कमिशनमध्ये माघार घ्यावी लागेल, आपल्या लोकांनाही समजवा. काहीही काळजी करु नका आपण एकत्र आहोत. आताची पिढी वेगळी आहे”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. श्रींकांत शिंदे नेमकं काय म्हणाले? “आम्ही कधीच राजकारण केले नाही. कामात राजकारण केले नाही. विशेषनिधी फक्त कळवा-मुंब्रा करता कायम राहणार. पण आमचे प्रेम आपल्याला दिसत नाही. एकत्र येवून काम केले तर सर्व काम होतील”, असा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी दिला.

  Published by:Chetan Patil

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *