Home » मुंबई » चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडली अन् घडलं विपरीत; नाल्यात आढळले मायलेकाचे मृतदेह

चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडली अन् घडलं विपरीत; नाल्यात आढळले मायलेकाचे मृतदेह

चिमुकल्याला-घेऊन-घराबाहेर-पडली-अन्-घडलं-विपरीत;-नाल्यात-आढळले-मायलेकाचे-मृतदेह

मुंबई, 15 जानेवारी: मुंबईतील (Mumbai) कुर्ला परिसरातील नेहरूनगरमधून गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेल्या मायलेकाचा मृतदेह चेंबूर (Chembur) येथील एका नाल्यात आढळल्याची (Mother and son found dead) खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत महिला आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडली होती. त्यानंतर त्या घरी परत आल्याच नाहीत. त्यामुळे मृत महिलेच्या पतीने नेहरूनगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासात हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे. श्रुती महाडिक (वय 36) आणि राजवीर महाडिक (वय 3) असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे. मृत श्रृती ह्या नेहरूनगरमध्ये आपल्या पतीसह सासरच्या मंडळींसोबत वास्तव्याला होत्या. दरम्यान, घटनेच्या दिवशी बुधवारी त्या आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. रात्री उशिरापर्यंत पत्नी आणि मुलगा घरी न आल्याने पतीने नेहरूनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता पोलीस चेंबूर येथील लाल डोंगर परिसरापर्यंत पोहोचले. हेही वाचा-कानाचा चावा घेत पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्याला हादरवणारी घटना याच परिसरात अल्टा विस्टा इमारतीत श्रुती यांचे माहेर आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, श्रुती आपल्या मुलाला घेऊन अल्टा विस्टा इमारतीत शिरताना दिसल्या, पण त्या आपल्या घरी गेल्याच नाहीत. त्यामुळे श्रुती आणि राजवीर यांच्यासोबत नेमकं काय झालं याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आसपासचा परिसर पिंजून काढला. दरम्यान याच परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात इमारतीच्या पाठीमागील नाल्यात काहीतरी पडल्याने पाणी उडाल्याचं दिसलं. हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीला आणलं नाकीनऊ, Instaवरील तरुणाचा कांड वाचून हादराल त्याच अधारे पोलिसांनी नाल्यात शोध घेतला असता, तीन वर्षीय राजवीरसह श्रुती यांचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित इमारतीत शिरल्यानंतर त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ बनलं आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याची कोणीतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime news, Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed