Home » मुंबई » शरद पवारांचा भाजपला धक्का, 'या' नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

शरद पवारांचा भाजपला धक्का, 'या' नेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

शरद-पवारांचा-भाजपला-धक्का,-'या'-नेत्याच्या-हाती-राष्ट्रवादीचं-घड्याळ

भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे नेते विजय गव्हाणे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी : भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janata Party) एक मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी आमदार विजय गव्हाणे (Former MLA Vijay Gavhane) यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आपल्या हाती बांधलं आहे. विजय गव्हाणे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं वृत्त होतं आणि ते लवकरच भाजपला रामराम करतील अशी चर्चा होती. अखेर आज विजय गव्हाणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (Former MLA Vijay Gavhane joins NCP) विजय गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे आता परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल असं बोललं जात आहे. विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, विजय गव्हाणे यांचे स्वागत, ते मनाने आणि विचाराने तिकडे गेले होते असे जाणवले नाही. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले अनेक जण आहेत जे परतीच्या मार्गावर आहेत. भारतीय जनता पक्षाची साफसफाई करून तिथले लोक आपल्याकडे येतील. वाचा : 13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत – शरद पवार शरद पवार यांनी म्हटलं, देशातील सत्ताधारी पक्षाला खरच सामान्यांबद्दल काही वाटतं का? हा प्रश्न आहे. पण सामान्यांच्या ताकदीपुढे माणूस कितीही मोठा असो त्याचे काही चालत नाही. उत्तरप्रदेशात म्हणत होते की, भाजपच येईल आता काय होत आहे? त्यांचे लोक सोडून बाहेर पडत आहेत. गोव्यातही असेच सुरू आहे. गव्हाणे हे घरचे आहे. त्यांना तुमचे स्वागत करतो असे काय म्हणायचे? जे कुणी गेले असतील त्यांचे मन वळवा, त्यात तुम्हाला यश येईल असे मला वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर विजय गव्हाणे म्हणाले, गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर 14 संघटन मंत्री भाजपने काढून टाकले. त्यांच्या जागी केवळ सवर्ण घेतले. देवेंद्र फडणवीस अॅक्टर आहेत, आज खरी भाजप राणे चालवत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने घडलेला एकच नेता महाराष्ट्रात आहे तो म्हणजे शरद पवार. पंकजाताईला मी सांगतो की, तुझ्यातला गोपीनाथराव जागा कर आणि जागी हो.. साहेबांनी (शरद पवार) मला बोलावले आणि माझ्या सगळ्या चुका पदरात घेतल्या. वाचा : पवार पंतप्रधान आणि मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडतील?BJPच्या प्रश्नावर राऊत म्हणाले भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत गेलेल्या विजय गव्हाणे यांचा परिचय जुन्या पिढीचे राजकीय पुढारी म्हणून विजय गव्हाणे यांची ओळख आहे 1985 साली परभणी मतदारसंघातून शेकापकडून पहिल्यांदा आमदार झाले 1995 राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवली पण पराभूत झाले मराठवाडा विकास आंदोलनात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आंदोलन केलं 2003 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून विजय गव्हाणे यांची ओळख आहे भाजपामध्ये प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून काम केलं आहे

Published by:Sunil Desale

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: BJP, NCP, Sharad pawar

Leave a Reply

Your email address will not be published.