Home » मुंबई » मुंबईतील कुटुंबाला 22 वर्षांनंतर मिळालं चोरीचं सोनं;आताची किंमत ऐकून हैराण व्हाल

मुंबईतील कुटुंबाला 22 वर्षांनंतर मिळालं चोरीचं सोनं;आताची किंमत ऐकून हैराण व्हाल

मुंबईतील-कुटुंबाला-22-वर्षांनंतर-मिळालं-चोरीचं-सोनं;आताची-किंमत-ऐकून-हैराण-व्हाल

मुंबई, 13 जानेवारी : जर तुमचा 13 लाखांचा माल चोरीला (Theft) गेला आणि तो हाती आला तेव्हा त्याची किंमत इतक्या पटीने वाढली, तर याला चोरी म्हणावं की गुंतवणूक? मुंबईतून अशीच एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षांपूर्वी झालेल्या चोरीच्या काही दिवसात चोरी झालेलं सोनं (Gold Prize) जप्त करण्यात आलं होतं. मात्र कायदेशीर गुंतागुतींत अडकल्यामुळे हे सोनं कुटुंबीयांना मिळू शकलं नाही. आता कोर्टाने या प्रकरणात निर्वाळा दिला आहे. प्रसिद्ध फॅशन ब्रँण्ड चिरा दिनचे मालक अर्जन दासवानींच्या घरातून 1998 मध्ये एक गोल्ड कॉइन, दोन गोल्ड ब्रेसलेट आणि 100 ग्रॅम आणि 200 मिलीग्रॅम वजनाच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. तेव्हा याची किंमत 13 लाख रुपये होती, त्याची किंमत 8 कोटींपर्यंत गेली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता हे सोनं अर्जुनचा मुलगा राजू दासवानी याला परत देण्यात आलं आहे. संपूर्ण कुटुंबाला अडकवून 1998 मध्ये झाली होती चोरी.. अर्जन दासवानींच्या कुलाबास्थित घरात 8 मे 1998 मध्ये ही चोरी झाली होती. चोरांनी धारदार शस्त्राने आधी सिक्युरिटी गार्डला जखमी केलं. आणि यानंतर संपूर्ण दासवानी कुटुंबाला एका खोलीत डांबून ठेवलं. त्यांनी तिजोरीची किल्ली घेऊन सोनं चोरी केलं. या घटनेच्या काही दिवसात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आणि तिघांना 1999 मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींकडे चोरी केलेलं सोनं सापडलं होतं. या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. त्यांची अटक होत नाही तोपर्यंत सोनं पोलिसांच्या कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. मात्र उरलेल्या आरोपींची अटक न झाल्याने पीडित कुटुंबाने सोनं परत देण्याचं अपील केलं. हे ही वाचा-Mumbai:’लिव्ह इन पार्टनर’च्या बाळाचा 5 लाखात केला सौदा, कथित बापासह 11जणांना अटक राजू दासवानीने या संपत्तीशी संबंधित कागदपत्र कोर्टासमोर दाखवली. ज्याच्या आधारावर हे सोनं पीडित कुटुंबाचं असल्याचं सिद्ध होत आहे. त्यानंतर न्यायाधीशाने हे सोनं पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. गेल्या अनेक वर्षांत या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या प्रतीक्षेत न राहता पीडित कुटुंबाला त्यांचं सोनं देण्याचे आदेश देण्यात आले.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Gold, Gold price, Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.