Home » मुंबई » लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होते? पंतप्रधान मोदींनी दिले थेट उत्तर

लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होते? पंतप्रधान मोदींनी दिले थेट उत्तर

लस-घेतल्यानंतरही-कोरोनाची-लागण-होते?-पंतप्रधान-मोदींनी-दिले-थेट-उत्तर

मुंबई, 13 जानेवारी : देशभरात पुन्हा एकदा कोरोना (corona)ने डोकं वर काढले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनची (omicron) रुग्ण संख्या वाढली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ‘लस (corona vaccine) घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होते, मास्क घातला तरी कोरोना होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहे. याकडे जनतेनं दुर्लक्ष केले पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशभरात कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला.

Speaking at meeting with the Chief Ministers. https://t.co/VDA7WeB7UA

— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2022

लसीकरणाबद्दल कोणत्याही अफवांवर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. अशा गोष्टींना टिकू द्यायचे नाही. अनेक वेळा लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय मग काय फायदा आहे. मास्क घातला तरी कोरोनाची लागण होतो, याचा फायदा होत नाही अशा अफवा पसरल्या आहे. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं. ‘भारताची लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे, परिश्रम एकमात्र आपले ध्येय आहे. आपण 130 भारतीय लढा देत आहोत. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत महत्तपूर्ण चर्चा झाली आहे.  ओमायक्रॉनचा संशय होता तो आता दूर झाला आहे. ओमायक्रॉनमुळे जास्त प्रमाणात संसर्ग होत आहे. अमेरिकेत १४ लाख केसेस सापडल्या आहे. भारतात आपण लक्ष ठेवून आहोत.  पॅनिक परिस्थिती निर्माण होईल याची खबरदारी घ्यावी लागले. सण उत्सवात लक्ष ठेवावे लागणार आहे. लोकांनी याकडे दुर्लक्ष करू नये, असं पंतप्रधान म्हणाले. (बिकानेर अपघातीच भयानक भीषणता, 12 डब्बे घसरले, 4 डब्बे जमिनीवर कोसळले) भारतातील लशी जगभरात दिल्या जात आहे. 90 टक्के लोकांना पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसरा डोस 70 टक्के पूर्ण झाला आहे. लसीकरण अभियानाला वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून तीन दिवसबाकी आहे. भारत आता 3 कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण करत आहे.  आज राज्यांकडे लशीचा साठा उपलब्ध आहे. आरोग्य सेवकांना जितक्या लवकरच बुस्टर डोस लागेल ते चांगलं आहे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली. ‘आपल्याला कोरोनाविरोधात लढाईचा दोन वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक परिस्थितीचे नुकसान होईल असं होऊ द्यायचं नाही. सामन्य लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक गती कमी होऊ नये याची खबरदारी घेत आहोत’ असंही मोदी म्हणाले. (जेवणासाठी करावा लागत होता संघर्ष, स्ट्रगल आठवल्यानंतर अभिनेता भावुक) ‘जिथून जास्त केसेस येत आहे, तिथे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. होमआयसोलेशनमध्ये जास्त उपचार झाले पाहिजे. होम क्वारंटाइनसाठी लागू केलेल्या नियमावलीचे पालन करा, त्यामुळे रुग्णालयात लोकांना जाण्याची गरज भासणार नाही आणि रुग्णालयात गर्दीही होणार नाही, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ‘काही राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. वेगवेगळे प्रयोग करत आहे. केंद्राकडून  औषधी दिली जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक राज्यासोबत उभी आहे. केंद्र सरकारने २३ हजार कोटींचे विशेष पॅकेज दिले होते, त्याचा उपयोग करत अनेक राज्यांनी वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे उभ्या केल्या आहे’ असं म्हणत पंतप्रधानांनी राज्यांचं कौतुक केलं. (corona virus : 8 महिने उपचार, 8 कोटी रुपये खर्च; तरीही वाचू शकला नाही शेतकऱ्याचा) ‘घरगुती उपचार असता जसे आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. सर्दी खोकल्यावर काढा दिला जातो, त्याचा वापर या हंगामात केला पाहिजे, हा वैद्यकीय उपचार म्हणून सांगत नाही तर घरगुती उपचार म्हणून सांगतोय’, असंही पंतप्रधान म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed