Home » मुंबई » मुंबईत राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मुंबईत राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

मुंबईत-राडा,-शिवसैनिक-आणि-भाजप-कार्यकर्त्यांमध्ये-धक्काबुक्की

नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच ( bjp office nariman point) शिवसैनिकांनी निदर्शनं केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौमय्या यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.

नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच ( bjp office nariman point) शिवसैनिकांनी निदर्शनं केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौमय्या यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : कर्नाटकमधील (karantaka) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru)   पुतळ्याची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबईत शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांनी भाजपच्या (mumbai bjp office) कार्यालयासमोर निदर्शनं केली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. बंगळुरूमधील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निदर्शनं सुरू आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून  निदर्शनं करण्यात आली.  संध्याकाळी नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच शिवसैनिकांनी निदर्शनं केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौमय्या यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले. शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शनं सुरू असताना यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी केली.  यावेळी शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की होऊन राडाही झाला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण, पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला सारले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.  ‘छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ‘नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात,  देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवत बदलत नाहीत, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे, अशी मागणीच ठाकरे यांनी केली.

Published by:sachin Salve

First published:

Leave a Reply

Your email address will not be published.