Home » मुंबई » कोविडच्या धास्तीनं तरुण जोडप्यानं संपवलं जीवन; मुंबईमधील मन हेलावून टाकणारी घटना

कोविडच्या धास्तीनं तरुण जोडप्यानं संपवलं जीवन; मुंबईमधील मन हेलावून टाकणारी घटना

कोविडच्या-धास्तीनं-तरुण-जोडप्यानं-संपवलं-जीवन;-मुंबईमधील-मन-हेलावून-टाकणारी-घटना

Couple Suicide in Mumbai: कोरोना संसर्गाच्या (Corona pandemic) धास्तीनं मुंबईतील एका जोडप्यानं विष घेऊन आत्महत्या (Couple commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 01:40 PM IST

मुंबई, 24  जुलै: कोरोना संसर्गाच्या (Corona pandemic) धास्तीनं मुंबईतील एका जोडप्यानं विष (Poison) घेऊन आत्महत्या (Couple commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या तरुण वयात दोघांनी अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. दोघंही कोरोनातून बरेही झाले होते. पण संसर्गाच्या भीतीतून त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अजय कुमार (वय-34) आणि सुज्जा एस. ( वय-30) असं आत्महत्या केलेल्या जोडप्याचं नाव आहे. ते मुळचे केरळ राज्यातील रहिवासी आहेत. दोघंही सध्या नोकरीच्या निमित्तानं वरळी येथे आले होते. दोघंही वरळी येथील भारत मिल्स कंपाऊंडमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्याला होते. दोघांचा संसार सुखात चालला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. पण कोरोनाच्या धास्तीमुळे त्यांच्या संसार आर्ध्यावरच मोडला आहे.

हेही वाचा-बंदुकीसह सेल्फी घेताना घडला जीवघेणा प्रकार; लग्नाच्या 2 महिन्यात संसार उद्ध्वस्त

मृत सुज्जा या फोर्ट येथील एका खासगी बॅंकेत, तर अजय हा नवी मुंबईतील एका कंपनीत नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी दोघांना कोविड झाला होता. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघंही ठणठणीत होऊन घरी परतले होते. सुज्जा तिच्या आईकडे जाऊनही आल्या होत्या. कोरोनातून बरं झाल्यानंतर मृत दाम्पत्याला पुन्हा कोरोना संसर्गाची लक्षणं दिसू लागली होती. यामुळे दोघांनाही प्रचंड नैराश्य आलं होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइडनोटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा-पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती; काजलच्या आत्महत्येनंतर देवेंद्रचा मृतदेह आढळला

बुधवारी सकाळी मृत सुज्जाची आई तिला फोन करत होती. पण समोरून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सुज्जा यांच्या आईनं त्याच इमारतीत राहणाऱ्या सुज्जाच्या मित्राला फोन करून घरी जाण्यास सांगितलं. सुज्जाच्या मित्रानं घराचा दरवाजा ठोठावला असता, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यानं शेजारील लोकांच्या मदतीनं दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा अजय आणि सुज्जा दोघंही मृतावस्थेत आढळले. संबंधित दाम्पत्यानं नेमकं कोणतं विष घेतलं हे स्पष्ट झालं नाही. दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 24, 2021, 1:40 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *