Home » मुंबई » 'इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नसेल' भाजपची टीका

'इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नसेल' भाजपची टीका

'इतका-वेगवान-मुख्यमंत्री-देशाच्या-इतिहासात-झाला-नसेल'-भाजपची-टीका

BJP criticise CM Uddhav Thackeray: राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली पूरस्थिती आणि दुर्घटना यावरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 12:07 PM IST

मुंबई, 24 जुलै : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार (Extreme heavy rainfall in Konkan Western Maharashtra) झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेत रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत (Taliye landslide) तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

रायगड जिल्ह्यातली महाड जवळ असलेल्या तळीये गावात दरड कोसळून 44 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्यापही अनेक नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून शोधमोहिम, बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तळीये गावाच्या दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं, “इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”.

Maharashtra Rain: राज्यात मृत्यूचं तांडव; आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू तर 45 जण बेपत्ता

इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल… pic.twitter.com/LR0PZNgAtp

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 24, 2021

तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ विरोधी पक्षाचे नेते सुद्धा दाखल झाले होते. मात्र, मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी जात असल्याने भाजपने त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा तळीये दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत.

महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील

दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील

Published by: Sunil Desale

First published: July 24, 2021, 12:07 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *