Home » मुंबई » राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार; आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू तर 45 बेपत्ता

राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार; आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू तर 45 बेपत्ता

राज्यात-मुसळधार-पावसामुळे-हाहाकार;-आतापर्यंत-136-जणांचा-मृत्यू-तर-45-बेपत्ता

Maharashtra flood: राज्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि यामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे 136 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 10:52 AM IST

मुंबई, 24 जुलै : राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Maharashtra) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. याच काळात झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संदर्भातील राज्य सरकारने जी आकडेवारी दिली आहे ती नक्कीच धक्कादायक आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत तब्बल 136 जणांचा मृत्यू (136 people lost life) झाला आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 23 जुलै 2021 या पावने दोन महिन्यांच्या कालावधीत 136 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. मुसळधार पाऊ, पूरस्थिती आणि त्यामुळे उद्भवलेल्या इतर घटनांत या नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्याप 45 नागरिक हे बेपत्ता आहेत.

या कालावधीत 70 नागरिक जखमी झाले आहेत. तर 38 जणावरे दगावली आहेत. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत बचावकार्य करुन 1200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

कोल्हापुरात महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला; राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 6 फूट पाणी, धक्कादायक VIDEO

1 जून ते 23 जुलै 2021 पर्यंतची आकडेवारी

मृत्यू – 136

बेपत्ता व्यक्ती – 45

जखमी व्यक्ती – 70

जनावरे मृत्युमुखी – 38

बचावकार्य

रत्नागिरी – 1200

सातारा – 27

मृतकांचा आकडा वाढण्याची भीती

राज्य सरकारने दिलेली ही आकडेवारी 21 जिल्ह्यांतील आहे. तसेच रत्नागिरी, रायगड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत अद्यापही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य सरकारकडून जी नव्याने आकडेवारी जाहीर करण्यात येईल त्यात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Published by: Sunil Desale

First published: July 24, 2021, 10:42 AM IST

Leave a Reply

Your email address will not be published.