Home » Uncategorized » परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला, 6 तास कसून चौकशी; माजी आयुक्तांवर 5 गुन्हे दाखल

परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला, 6 तास कसून चौकशी; माजी आयुक्तांवर 5 गुन्हे दाखल

परमबीर-सिंग-यांचा-जबाब-नोंदवला,-6-तास-कसून-चौकशी;-माजी-आयुक्तांवर-5-गुन्हे-दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Param Bir Singh) अखेर गुरुवारी मुंबईत परतले.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 26 नोव्हेंबर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Param Bir Singh) अखेर गुरुवारी मुंबईत परतले. परमबीर सिंग काल चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या (Crime Branch) कार्यालयात पोहोचले. यावेळी परमबीर सिंग यांची 6 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या प्रकरणात डीएसपी नीलोत्पल आणि त्यांच्या टीमने त्याची चौकशी केली आहे. याप्रकरणी सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी त्यांना फरार घोषितही करण्यात आलं होतं. परमबीर सिंग यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. पोलिसांसमोर हजर झाले. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जिथे गरज असेल तिथे आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. इतर बाबतीतही पूर्ण सहकार्य केले जाईल. परमबीर सिंग यांनी बुधवारी सांगितले की, ‘मी चंदीगडमध्ये आहे’ परमबीर सिंग यांनी बुधवारी सांगितलं होतं की, ते चंदीगडमध्ये आहेत. यानंतर त्यांनी स्वतः मुंबई पोलिसांसमोर हजर होऊन तपासात मदत करणार असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी सिंग यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितलं होतं की, परमबीर सिंग यांना या संपूर्ण प्रकरणात गोवलं जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रष्ट कारभारासाठी शिक्षा केली, तेच अधिकारी आज तक्रारदार बनले आहेत. हेही वाचा-  मोठी बातमी ! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार

   परमबीर यांच्या जीवाला मुंबईत धोका आहे, त्यामुळे ते शहराबाहेर आहे, असंही कोर्टात त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत.

  परमबीर यांच्यावर 5 गुन्हे दाखल राज्य सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात लूक आउट परिपत्रक जारी केलं आहे. सिंह यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक मुंबई, एक ठाण्यात आणि तीन प्रकरणांचा तपास राज्य सीएआय करत आहे. परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारच्या गृह विभागाने 7 सदस्यीय एसआयटी टीमची स्थापना केलीय. या टीमचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करत आहेत.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed