Home » Uncategorized » मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, 'या' उमेदवाराने घेतली माघार

मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, 'या' उमेदवाराने घेतली माघार

मुंबईची-विधानपरिषद-निवडणूक-बिनविरोध-होणार,-'या'-उमेदवाराने-घेतली-माघार

मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, ‘या’ उमेदवाराने घेतली माघार (Photo: Mls.org.in)

Mumbai MLC Election updates: मुंबई विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

मुंबई, 25 नोव्हेंबर : विधान परिषदेच्या मुंबईतील जागा (Mumbai MLC election) आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सुरेश कोपरकर (Suresh Koparkar) यांनी आपला अर्ज माघे गेतला आहे. सुरेश कोपरकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि ज्याला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. पण आता अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंग (Rajhans Singh) तर शिवसेनेचे सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा सोडली होती आणि त्यानंतर आता शिवसेनेने विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वाचा : विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेनं  मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदेंना उमेदवारी दिली आहे. सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असं आश्वासनं दिलं होतं. अखेर सेनेकडून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेली विधान परिषद जागेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केणेकर यांना पक्षश्रेष्ठींनी मुंबईत बोलावलं होतं. ते 22 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. अखेर ही माहिती खरी ठरली आहे. केणेकर 22 नोव्हेंबरला खरंच विधान भवन परिसरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे प्रविण दरेकरांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याने विधान परिषदेच्या या जागेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021

Published by:Sunil Desale

First published:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *