Home » मुंबई » आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय, साहसी पर्यटनाबद्दल धोरण जाहीर!

आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय, साहसी पर्यटनाबद्दल धोरण जाहीर!

आदित्य-ठाकरेंचा-मोठा-निर्णय,-साहसी-पर्यटनाबद्दल-धोरण-जाहीर!

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (maharashtra cabinet meeting) आज पार पडली. यावेळी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास…

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 14, 2021 08:04 PM IST

मुंबई, 14 जुलै : राज्यात कोरोनाच्या (corona) परिस्थितीमुळे अनेक निर्णय आणि योजनांना ब्रेक लागला होता. पण, आता कोरोनाच्या लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने कामाचा धडाका लावला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी राज्याचे साहसी पर्यटन ( adventure tourism policy Maharashtra) धोरणास मान्यता देण्यात आल्याची घोषणा केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (maharashtra cabinet meeting) आज पार पडली. यावेळी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे भरती; इतका मिळेल पगार

या धोरणानुसार, राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

IND vs ENG : County मध्ये अश्विनचा धमाका, स्पिनसमोर विरोधी टीम गारद

साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती व विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील. या समित्यांमध्ये जमीन हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबद्धरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील, असंही आदित्य यांनी सांगितलं.

Published by: sachin Salve

First published: July 14, 2021, 8:04 PM IST

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.