Home » Uncategorized » गँगस्टर सुरेश पुजारीच्या फिलिपिन्समध्ये आवळल्या मुसक्या

गँगस्टर सुरेश पुजारीच्या फिलिपिन्समध्ये आवळल्या मुसक्या

गँगस्टर-सुरेश-पुजारीच्या-फिलिपिन्समध्ये-आवळल्या-मुसक्या

गँगस्टर सुरेश पुजारीला (Gangster Suresh Pujari ) फिलिपिन्समध्ये (Philippines) अटक करण्यात आली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 20 ऑक्टोबर: गँगस्टर सुरेश पुजारीला (Gangster Suresh Pujari ) फिलिपिन्समध्ये (Philippines) अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा 2007 पासून अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पुजारीच्या शोधात होती. गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुजारीविरोधात सर्वाधिक वसुली आणि खंडणीचे गुन्हे ठाण्यामध्येच जास्त नोंदवले आहेत. फिलिपिन्सचे वृत्तपत्र मनिला बुलेटिननुसार, 48 वर्षीय पुजारीला परुनाक शहरातील एका निवासी इमारतीतून ब्युरो ऑफ इमिग्रेशनने अटक केली. वृत्तपत्रानुसार, तो फिलिपिन्समध्ये बेकायदेशीरपणे राहत होता आणि त्याला बाहेर काढण्यात येणार होते. पुजारीला अमेरिकेनं फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे त्याचं फिलिपिन्समधून अमेरिकेत प्रत्यार्पण केलं जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा- श्रीसंतनं शेअर केला हरभजनसोबतचा Photo, फॅन्सना आठवली 13 वर्षांपूर्वीची घटना  मुंबई पोलिसांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली नसली तरी, , फिलिपाईन्सच्या वृत्तपत्र मनिला बुलेटिनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, परदेशातून ब्युरो ऑफ इमिग्रेशनने सुरेश बसाप्पा पुजारी (48) याला अटक केली आहे आणि तो बेकायदेशीरपणे देशात राहत होता. ठाण्यात पुजारीविरोधात खंडणीचे किमान 23 गुन्हे दाखल आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पुजारीविरोधात लुकआऊट नोटीस आणि इंटरपोलची (Interpol notice) रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. हेही वाचा- मुंबईत पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटींच्या हिरोइनसह महिला तस्करला अटक सुरेश हा गुंड रवी पुजारीचा जवळचा नातेवाईक आहे ज्याला दोन वर्षांपूर्वी सेनेगलमध्ये अटक केल्यानंतर भारतात पाठवण्यात आलं होतं. रवी पुजारीपासून वेगळे झाल्यानंतर सुरेश परदेशात पळून गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला गेल्या आठवड्यातच गुरुवारी अटक करण्यात आली.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *