Home » Uncategorized » भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांची ईडीकडून चौकशी

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांची ईडीकडून चौकशी

भोसरी-जमीन-घोटाळा-प्रकरण,-एकनाथ-खडसेंच्या-पत्नी-मंदाकिनी-यांची-ईडीकडून-चौकशी

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची ईडीकडून चौकशी

मुंबई, 19 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा (Bhosari MIDC land Scam) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. अटक होणार? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

We are here at the ED office. Mandakini Khadse is also here. We are following court orders & will cooperate in the investigation: Mohan Talekar, lawyer of Mandakini Khadse pic.twitter.com/zRat5QAx00

— ANI (@ANI) October 19, 2021

वाचा : एकनाथ खडसेंना मोठा झटका, पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची शक्यता मागील महिन्यात ईडीकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet)दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे. काय आहे प्रकरण? पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. वाचा : एकनाथ खडसेंची ईडीने केली होती 9 तास चौकशी काय आहे भोसरी जमीन खरेदीप्रकरण ? भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक 8 जुलै 2021 रोजी एकनाथ खडसेंची ईडीकडून 9 तास चौकशी

Published by:Sunil Desale

First published:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed