Home » Uncategorized » पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू, आता प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत

पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू, आता प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत

पुणे-मुंबईसाठी-हेलिकॉप्टर-सेवा-सुरू,-आता-प्रवास-होणार-अवघ्या-40-मिनिटांत

हेलिकॉप्टर सेवा दररोद खर्डी ते जुहू अशी सुरू करण्यात येईल. पुणे ते मुंबईसाठीचं एका व्यक्तीचं तिकीट 1500 रुपये असेल.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  पुणे, 14 ऑक्टोबर : पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमान सेवा 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद आहे. विमानसेवा बंद झाल्यामुळे आता सणासुदीच्या काळात खाजगी हवाई सेवा (Private air carrier Blade) सुरू करण्याची योजना आखली जात आहे. खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे ही सेवा देण्यात येणार आहे. यामुळे जवळपास 40 मिनिटांत पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे. ही हेलिकॉप्टर सेवा दररोज खर्डी ते जुहू अशी सुरू असेल. पुणे ते मुंबईसाठीचं एका व्यक्तीचं तिकीट 1500 रुपये असेल. हेलिकॉप्टर दररोज सकाळी 9.30 वाजता खर्डी आणि जुहूतून संध्याकाळी 4.30 वाजता निघेल. पुणे ते मुंबई दरम्यान Blade ही एकमेव खाजगी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर सेवेमुळे पुणे-मुंबई दरम्यान रस्ते प्रवासासाठी लागणारे पाच तास वाचतील. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा घोषित केली होती. विमान वाहतूक मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रायव्हेट हेलिकॉप्टर कंपनी Blade India Pvt Ltd. ने पुणे-मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

  शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी चेन्नईहून निघालेलं विमान थेट मुंबईला लँड

  सध्या पुणे आणि मुंबई दरम्यान कोणतीही व्यवसायिक उड्डाणं सुरू नाहीत. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवा एकमेव हवाई पर्याय आहे. विमानाशिवाय आता जलद प्रवासासाठी हा एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

  Pune Bank Jobs: महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे इथे ‘या’ पदांसाठी भरती; करा अर्ज

  एव्हिएशन विश्लेषक आणि एयर इंडिया पुणे स्टेशनचे माजी प्रभारी धैर्यशील वंदेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की हा प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरेल. पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांसह इतर प्रवाशांसाठीही ही सेवा फायदेशीर ठरेल. यामुळे अनेकांचा मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed