Home » Uncategorized » मोठी बातमी: इंदौर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, Watch Video

मोठी बातमी: इंदौर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, Watch Video

मोठी-बातमी:-इंदौर-पुणे-रेल्वेचे-दोन-डबे-रुळावरून-घसरले,-watch-video
 • Home
 • »

 • News
 • »

 • pune
 • »

 • मोठी बातमी: इंदौर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, मुंबईहून- पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे (Mumbai Pune) रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  पुणे, 27 सप्टेंबर: मुंबई-पुणे (Mumbai Pune) रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. इंदौर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरले. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजता ही घटना घडली आहे. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  इंदूर- दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले pic.twitter.com/NPCsIdFCjU

  — News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2021

  रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचं काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती. त्यावेळी लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी आहेत. त्यात प्रवासी देखील होते. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हेही वाचा- शिवसेनेचा असुद्दीन ओवेसींवर निशाणा, भाजपलाही फटकारलं  प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. इंदौर एक्सप्रेस सकाळी सात वाजून 57 वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळीच ही घटना घडली.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *