Home » Uncategorized » 'तीन दिवस, तीन बडे नेते'; किरीट सोमय्यांचं आघाडी सरकारला नवं चॅलेंज

'तीन दिवस, तीन बडे नेते'; किरीट सोमय्यांचं आघाडी सरकारला नवं चॅलेंज

'तीन-दिवस,-तीन-बडे-नेते';-किरीट-सोमय्यांचं-आघाडी-सरकारला-नवं-चॅलेंज

महाविकास आघाडी सरकारमधील मोठ्या नेत्याचं नाव यात उघड करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

अहमदनगर, 23 सप्टेंबर : ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गुंड माफियांचे आहे. त्यांचे ठेकेदार आणि शिष्य सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी घाबरणार नाहीत. तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. (Kirit Somaiya’s new challenge to the government) जसे घोटाळे काढत आहेय. त्यांच्या धमक्यांनी मी थांबणार नाही, काही केले तरी मी कोल्हापूरला जाणारच’ असे आव्हान भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader and former MP Kirit Somaiya) यांनी दिले. किरीट सोमय्या यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो. पारनेर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे,’ हे ही वाचा-मोठी बातमी ! काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण ‘माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आले तर मी त्याची माहिती घेतो. अभ्यास करतो. अधिक माहिती आणि पुरावे संकलित करून त्याचा पाठपुरावा करतो. सामान्य माणसाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो. पारनेर कारखान्याच्या बाबतीतही बचाव समिती मला येऊन भेटली. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही.   ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. जसे  घोटाळे काढत आहे तसतशी माझी किंमत वाढत त्यांच्या धमक्या मी थांबणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. संजय राऊत यांना दमडीचा अधिकार आहे का? ५५ लाख बेनामी आले होते ते कसे गुपचिप दिले ना. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला आहे.

Published by:Meenal Gangurde

First published:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *