Saturday, July 24, 2021
Homeमुंबईराज्यासाठी दिलासादायक बातमी, अर्धा महाराष्ट्र कोरोनातून लवकरच मुक्त पण...,

राज्यासाठी दिलासादायक बातमी, अर्धा महाराष्ट्र कोरोनातून लवकरच मुक्त पण…,

आकडेवारी पाहता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अनलॉक होईल का?

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 15, 2021 10:18 PM IST

 मुंबई, 15 जुलै : गेल्या दीड वर्षांपासून विळखा घालून बसलेल्या कोरोनाच्या (maharashtra corona cases) विळख्यातून आता महाराष्ट्राची (maharashtra) सुटका होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात 10 जिल्हे वगळता कोरोनाची लाट अंतिम टप्यात आली आहे. विदर्भ (vidarbha), खान्देशात एकूण 15 जिल्ह्यात गडचिरोली (gadchiroli) वगळता कोरोनाची रुग्णसंख्या एक आकडी आली आहे. मात्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आकडेवारी पाहता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अनलॉक होईल का? अशी आशा आहे.

राज्यात गेले तीन आठवडे कोरोनाची आकडेवारी एकाच ठिकाणी स्थिर आहे. आठवड्यात आकडेवारी 7 हजार ते 8 हजार या दरम्यान कमी जास्त होताना दिसते आहे. राज्यातील 18 जिल्ह्यात आकडेवारी दैनंदिन रुग्णसंख्या 15 पेक्षाही कमी आहे. त्यातील 10 जिल्ह्यात एक अंकी रुग्णसंख्या आढळून आली आहे. मात्र, या तुलनेत कोल्हापूर, सांगली सातारा पुणे, पिंपरी चिंचवड मुंबई, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, या दहा जिल्ह्यात राज्यातील 90 टक्के रुग्णसंख्या आहे.

बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पंचनामा

सर्वत्र कोरोनाची लाट ओसरली असताना पश्चिम महाराष्ट्रात लाट कायम कशी याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. आज आरोग्य विभागाच्या केंद्रीय पथकाने कोल्हापूरमध्ये भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. लॉकडाऊन, नियमांचं पालन, आरोग्य व्यवस्था, लसीकरण या सर्व परिस्थितीची नोंद घेतली.

साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला

राज्यात आकडेवारी स्थिर का? याविषयी माहिती जाणून घेतली असता कोरोना टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने यांनी सांगितले की, ‘राज्य सद्या सर्ज (SURGH) या अवस्थेत आहे. सर्ज म्हणजेच विषाणूमूळे आलेल्या व्हायरलची लाट जेंव्हा संपायला येते, त्या काळात ती काही ठिकाणी वाढते, उर्वरित ठिकाणी ती पूर्ण नियंत्रण येते ही स्टेज सद्या राज्यात आहे. लवकरच ज्या भागात कोरोना वाढला आहे. त्या भागात परिस्थिती आटोक्यात येईल आणि दुसरी लाट संपेल’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात ज्या भागात कोरोनाची लाट पूर्ण ओसरली त्याची आकडेवारी अशी…

भिवंडी – 3

मालेगाव – 2

धुळे मनपा – 5

धुळे ग्रामीण – 8

जळगाव – 7

जळगाव मनपा – 0

नंदुरबार – 2

सोलापूर मनपा – 8

जालना – 4

हिंगोली – 1

परभणी मनपा – 0

लातूर – 9

नांदेड – 1

नांदेड मनपा- 2

अकोला – 6

अकोला मनपा -3

अमरावती मनपा – 4

अमरावती -12

यवतमाळ – 3

बुलढाणा – 7

वाशीम 8

नागपूर 6

नागपूर मनपा 11

वर्धा 6

भंडारा 2

गोंदिया 2

चंद्रपूर 13

ही आकडेवारी सुखावणारी असली तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये आकडेवारीने केंद्र आणि राज्य सरकारची डोकेदुखीमध्ये वाढ केली आहे.

राज्यातील 23 जिल्ह्यात जर आकडेवारी दैनंदिन 15 रुग्ण संख्येपेक्षा कमी आहे हे पाहता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी वाढत आहे. येत्या 2 दिवसांत याबाबत राज्य सरकार कडून नवे निर्देश येण्याची शक्यता आहे.

Published by: sachin Salve

First published: July 15, 2021, 10:18 PM IST

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments