Saturday, July 24, 2021
HomeमुंबईVIDEO:फरसाण न दिल्यानं दुखावला आत्मसन्मान;लॉकडाऊनचं कारण देत पोलिसानं घेतला बदला

VIDEO:फरसाण न दिल्यानं दुखावला आत्मसन्मान;लॉकडाऊनचं कारण देत पोलिसानं घेतला बदला

Crime in Mumbai: वीकेंड लॉकडाऊनमध्ये देखील अनेक नागरिक दुकानं अर्धवट खुली ठेवून किंवा पूर्णपणे बंद ठेवून विविध पद्धतीनं आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 11:21 AM IST

मुलुंड, 16 जुलै: मागील दीड वर्षांपासून राज्यात सातत्यानं लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. त्यामुळे प्रशासनानं वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण वीकेंड लॉकडाऊनमध्ये देखील अनेक नागरिक दुकानं अर्धवट खुली ठेवून किंवा पूर्णपणे बंद ठेवून विविध पद्धतीनं आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. याप्रकरणी पोलीस प्रशासन संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई देखील करत आहेत. पण मुंबईनजीक असणाऱ्या मुलुंड परिसरातून एक विचित्र घटना समोर आली आहे.

येथील एका दुकानदारानं वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकान अर्धवट उघडं ठेवून व्यवसाय केल्याप्रकरणी पोलिसानं त्याला बेदम मारहाण केली आहे. संबंधित पोलिसानं काही दिवसांपूर्वी साडेचार हजार रुपयाचं फरसाण मागितलं होतं. पण दुकानदारानं फरसाण देण्यास नकार दिल्यानं पोलिसांनी वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत मारहाण केल्याचा दावा दुकानाचा मालक सुनील चौधरी यांनी केला आहे. दुकानातील कामगाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या; खूनाचं धक्कादायक कारण समोर

संबंधित घटना मुलुंडच्या इंद्रप्रस्थ विभागात घडली आहे. रविवारी सायंकाळी संबंधित दुकानदारानं  फरसाणचं दुकान अर्धवट उघडं ठेवून आपला व्यवसाय करत होता. दरम्यान त्याठिकाणी मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील आले. त्यांनी दुकानातील कामगारांना दुकान उघडं का ठेवलं? असा जाब विचारत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी संबंधित कामगाराला पोलीस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणीदेखील बेदम मारहाण केली आहे.

मुलुंड! फरसाण न दिल्यानं पोलिसानं घेतला बदला; वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत दुकानदाराला मारहाण…. pic.twitter.com/Yrs7OfUnHI

— Ravindra (@i_am_Ravindra1) July 16, 2021

हेही वाचा-भिवंडी हादरली, एकाच दिवशी 2 मुलांचा खून, 8 वर्षांचा सत्यमचा सोसायटीतच सापडला मृत

या मारहाणीत दुकानातील कामगाराच्या कानाला दुखापत झाली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे दुकानाच्या मालकाकडून पोलीस अधिकारी सचिन पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.  पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दुकानाचा मालक सुनील चौधरी यांना साडेचार हजार रुपयांचं फरसाण मागितलं होतं. दुकानदारानं फरसाण देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून पाटील यांनी वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत दुकानातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप दुकानदारानं आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 16, 2021, 8:58 AM IST

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments