Home » मुंबई » VIDEO : महाडमध्ये पुरसदृश्य स्थिती; नदीच्या पाणी पातळीत वाढ

VIDEO : महाडमध्ये पुरसदृश्य स्थिती; नदीच्या पाणी पातळीत वाढ

video-:-महाडमध्ये-पुरसदृश्य-स्थिती;-नदीच्या-पाणी-पातळीत-वाढ

बाजारपेठ परिसरात पुराचं पाणी शिरलं असून चिंता वाढली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 21, 2021 09:32 PM IST

महाड, 21 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचं धुमशान सुरू आहे. सातत्याने कोसळणाऱ्या सरींमुळे महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती उद्भवली आहे. सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून महाड शहर, बिरवाडी, महाड MIDC परिसरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुधवारी महाड परिसरात जोरदार पाऊस झाला असून सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे महाड शहर, बिरवाडी आणि महाड MIDC परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरातील क्रांतीस्थंभ, दस्तुरी नाका, भोईघाट, सुकट गल्ली आणि बाजार पेठ परिसरात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे. तर खरवली येथील बंधारा दुथडी भरून वाहत असुन महाड MIDC तील अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ pic.twitter.com/qnuurgMAdJ

— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2021

महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बाजार पेठ परिसरात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे. pic.twitter.com/9z7Pc1CDZg

— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2021

हे ही वाचा-Weather Update: महाराष्ट्रातल्या ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी

हवामान खात्यानं आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार आहे. तसेच वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.

Published by: Meenal Gangurde

First published: July 21, 2021, 9:32 PM IST

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *