Home » मुंबई » 'त्या' व्हायरल क्लिपमुळे अनिल परब अडचणीत? भाजपने केली मोठी मागणी

'त्या' व्हायरल क्लिपमुळे अनिल परब अडचणीत? भाजपने केली मोठी मागणी

'त्या'-व्हायरल-क्लिपमुळे-अनिल-परब-अडचणीत?-भाजपने-केली-मोठी-मागणी

Anil Parab video clip viral: शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

Anil Parab video clip viral: शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 25 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना काल (24 ऑगस्ट 2021) रत्नागिरीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना महाड न्यायालयात (Mahad Court) हजर केले असता न्यायालयाने जामीनावर सुटका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राणेंवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच या व्हायरल होत असलेल्या क्लिपमुळे अनिल परब अडचणीत येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल (Anil Parab video clip viral) होत आहे. एका पत्रकार परिषदेत बसलेले अनिल परब मोबाइल फोनवर बोलत असून त्यात त्यांनी केलेले संभाषण स्पष्टपणे ऐकण्यास मिळत आहे. या व्हिडीओ क्लिपच्या आधारे भारतीय जनता पक्षाने अनिल परबांवर आरोप केला आहे की, राणेंच्या अटकेसाठी परबांनी पोलिसांवर दबाव आणला आहे. सिंधुदुर्गातील वातावरण तापलं, शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला व्हायरल झालेल्या या क्लिपवरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी गाणी भातखळकर यांनी केली आहे. या व्हायरल होणाऱ्या क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही. व्हिडीओ क्लिपवरुन न्यायालयात जाणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललं आहे. सगळं ड्राफ्टिंग झालंय, लवकरच अनिल परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली आहे.

    First published:

    Leave a Reply

    Your email address will not be published.