Home » मुंबई » लहान मुलांची काळजी घ्या! मुंबईतील मानखुर्दमध्ये 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

लहान मुलांची काळजी घ्या! मुंबईतील मानखुर्दमध्ये 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

लहान-मुलांची-काळजी-घ्या!-मुंबईतील-मानखुर्दमध्ये-18-मुलं-कोरोना-पॉझिटिव्ह

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 29 ऑगस्ट : केरळमध्ये (kerala corona case) कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे महाराष्ट्राला हायअलर्ट देण्यात आला आहे. केंद्राने नुकताच इशाराही दिला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून आता लहान मुलांना कोरोनाने टार्गेट केल्याचं समोर आलं आहे. मानखुर्दमधील चिल्ड्रन होममध्ये (Mankhurd Children Home) 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह (children corona positive ) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून योग्य खबरदारी घ्या असं वारंवार सूचवलं जात आहे. पण, मुंबई कोरोना हळूहळू हातापाय पसरत असल्याचं समोर येत आहे. मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रान होममध्ये 18 मुलं कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 18 मुलं पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे. उसाच्या फडात पोलिसांनी छापा टाकला अन् ते पाहून हैराण झाले, नगरमधील घटना या सर्व मुलांना चेंबूर आणि वाशी नाका येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्व मुलांना कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. या सर्व मुलांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर या मुलांच्या संपर्कात आलेल्या मुलांची यादी करण्यात आली असून तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, रत्नागिरीमध्ये एका मुलाला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. पण त्यानंतर 102 मुलांचा कोविड चाचणी घेण्यात आली, त्यामुळे 18 मुलं कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या सर्व मुलांना डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहे. कंदाहारमधील TV आणि RADIO वरील संगीत बंद, महिलांना घरचा रस्ता दरम्यान, आज राज्यात ४,६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर,  १३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. तर दुसरीकडे ३,५१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ % एवढा आहे. एकूण ५२,८४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  Published by:sachin Salve

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed