Home » मुंबई » तुम्ही तुमचं बघा, चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

तुम्ही तुमचं बघा, चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

तुम्ही-तुमचं-बघा,-चंद्रकांत-पाटलांच्या-आव्हानाला-संजय-राऊतांचं-प्रत्युत्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई महापालिकेत (BMC) एक सेफ जागा निवडणूक (Election) लढून जिंकून येऊन दाखवावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही कोल्हापूर (Kolhapur)सोडून कोथरुडला (Kothrud) आले, आम्ही काही बोललो का?, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांतदादांना दिलं आहे. टीव्ही 9 नं दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का? मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पाहावं. माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे, असं म्हणत राऊतांनी त्यांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे. माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणार आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार, असंही संजय राऊत म्हणालेत. पुणे मेट्रोवरुन राजकारण तापणार? देवेंद्र फडणवीस करणार कामाची पाहणी  काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं. एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येऊन दाखवावे त्यांनी त्यांचे दंड ही थोपटून पहावे आणि ताकद ही पाहावी, असं म्हटलं होतं. त्यावर आज संजय राऊत म्हणाले, तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले. आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू. तुम्ही तुमच बघा.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.