Home » मुंबई » बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? राऊतांनी केसरकरांना दाखवला गुलाबराव पाटलांचा VIDEO

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? राऊतांनी केसरकरांना दाखवला गुलाबराव पाटलांचा VIDEO

बाप-बदलण्याची-भाषा-कोण-करतंय?-राऊतांनी-केसरकरांना-दाखवला-गुलाबराव-पाटलांचा-video

Home /News

/mumbai

/

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? राऊतांनी केसरकरांना दाखवला गुलाबराव पाटलांचा VIDEO

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 27 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (ekanath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे सेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) विरुद्ध बंडखोर आमदार असा सामना रंगला आहे. राऊतांनी आता गुलाबराव पाटलांचा व्हिडीओ ट्वीट करून दीपक केसरकरांची (deepkak kesarkar) बोलती बंद केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने गेल्या 7 दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जळगावमधील सेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असं म्हणत राऊत यांनी केसरकरांना टोला लगावला.

  बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc

  — Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022

  या व्हिडीओमध्ये गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेमध्ये पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील हा मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, ‘कत्तलीया कही साप बदल लेते हे, पुण्य की आडमध्ये पाप बदल लेते हे और मतलब के लिए बाप बदल लेते है” काय म्हणाले होते केसरकर? ‘आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो. कोकणी माणसांनी शिवसेना उभी केली आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला. ‘चौपाटी ही राज्याचा मुख्यमंत्री ठरवत नाही. मुख्यमंत्री हे नरिमन पॉईंटमधील विधीमंडळात ठरत असतो, जनता ठरवत असते. ते पवित्र असे व्यासपीठ आहे. त्यांनी एक आमदाराला जनावराची उपमा दिली. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले. महिन्यापूर्वीच तुम्हाला आमदारांनी निवडून आणलं. कुठल्या तरी माणसाच्या मनात वेदना निर्माण होते. त्यामुळे वाद निर्माण होते, राज्यात दंगली निर्माण होतात. जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच केसरकर यांनी दिला.

  Published by:sachin Salve

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Leave a Reply

  Your email address will not be published.