Home » मुंबई » म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली कळकळीची विनंती

म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली कळकळीची विनंती

म्हणून-देवेंद्र-फडणवीसांनी-भाजपच्या-कार्यकर्त्यांना-केली-कळकळीची-विनंती

Devendra Fadnavis birthday: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 19, 2021 02:12 PM IST

मुंबई, 19 जुलै: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी वाढदिवस (Birthday) आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं आवाहन केलं आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

VIDEO: कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा आनंद गगनात मावेना, काढली  बैलगाडीतून रॅली

एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 19, 2021, 1:10 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed