Home » मुंबई » 'भाजपने अपहरण केलेले आमदार संपर्कात; आमच्याकडे बहुमत', संजय राऊतांचा दावा

'भाजपने अपहरण केलेले आमदार संपर्कात; आमच्याकडे बहुमत', संजय राऊतांचा दावा

'भाजपने-अपहरण-केलेले-आमदार-संपर्कात;-आमच्याकडे-बहुमत',-संजय-राऊतांचा-दावा

मुंबई 23 जून : राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान वर्षावर शिवसेनेने आपल्या आमदारांना बोलावलं आहे. याठिकाणी जमललेल्या 15 आमदारांसोबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी मोठे खुलासे केले आहेत. आमदारांचं अपहरण करून भाजपने त्यांना आपल्यासोबत नेलं आहे. सर्वांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Maharashtra News, Maharashtra politics, Sanjay raut, Shiv sena

Leave a Reply

Your email address will not be published.