Home » मुंबई » मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का; या खासदारांचंही एकनाथ शिंदेंना समर्थन

मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का; या खासदारांचंही एकनाथ शिंदेंना समर्थन

मुख्यमंत्र्यांना-आणखी-एक-धक्का;-या-खासदारांचंही-एकनाथ-शिंदेंना-समर्थन

मुंबई 23 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही (Shivsena MP) उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने शिवसेनेच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. अबतक 36! एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आकडाच ठरवणार; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही गळती थांबेना मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आमदारांची संख्या वाढली? आणखी सहा आमदार संपर्कात नाही आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात उतरल्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतरही शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

Leave a Reply

Your email address will not be published.