Home » मुंबई » Agnipath Scheme : 'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

Agnipath Scheme : 'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

agnipath-scheme-:-'हा-सैन्य-दलाचा-अपमान',-संजय-राऊत-मोदी-सरकारवर-भडकले

मुंबई, 18 जून :  केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला भारतातील अनेक भागांतून विरोध (Agnipath Scheme Protest).  होताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये तरुणांमध्ये आगडोंब उसळला आहे. ‘ सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल. हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’वरून उत्तर भारतात संतप्त पडसाद उमटत आहे. अनेक तरुण मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मोदी सरकारची प्रत्येक योजना ही अपयशी ठरली आहे.  प्रत्येक योजना अशीच आहे. आधी 2 कोटी नोकरी देण्याची घोषणा केली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं होतं. आता काय तर अग्निपथ काढले आहे. सैन्य हे पोटावर चालत असते. सैन्यात एक शिस्त असते. सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, भारतीय सैन्याची प्रतिष्ठा आहे ती रस्सातळाला जाईल, अशी टीका राऊ यांनी केली. (मधुमेहासाठी उपयुक्त असणाऱ्या जांभाळाचा वाढला भाव : VIDEO) तसंच, ‘सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. कामगारांना आणि गुलामांना कंत्राटीपद्धतीने घेतलं जात असतं.  देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल. हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे’ अशी टीकाही राऊत यांनी केली. ‘राष्ट्रपती निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून फोन केला जात असतो. भाजपकडून देशभरातील पक्षाला फोन केले जात आहे.  राजनाथ सिंह यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. मोदी सरकारचे लोक संपर्कात आहे. दोन्ही बाजूने समर्थन असलेला उमेदवार उभा केला जात आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे’ अशी माहितीही राऊत यांनी दिली. (आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता केलं भलं काम,VIDEO) घोटाळा झाल्याचे आरोपीने मान्य केले आहे. विक्रांत बचावच्या नावाखाली ते पैसे राजभवनात जमा केले नाही. ते पैसे आपल्याकडेच ठेवले. नंतर आता भाजपकडे जमा केले आहे, असं सांगत आहे. हा एक घोटाळा आहे. पोलीस अधिक तपास करत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली.

 • ‘मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल’, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

 • vidhan parishad election : भाजपच्या रणनीतीविरोधात राष्ट्रवादी वापरणार ‘खडसे कार्ड’, संध्याकाळी महत्त्वाची बैठक

 • vidhan parishad election : राज्यसभेतून धडा, विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय!

 • डमी मतपेटी, दिग्गज नेते आणि फाईव्ह स्टार हॉटेल, शिवसेनेची आमदारांसाठी अनोखी रंगीत तालीम

 • BREAKING : बोरीवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने, आदित्य ठाकरेही घटनास्थळी

 • विधान परिषदेआधी भाजपला धक्का, मोठ्या नेत्याचा मुलगा राष्ट्रवादीमध्ये!

 • ‘आप्पा, मी ऐकलं मला शिव्या दिल्या’, हितेंद्र ठाकूरांची भेट घेताच प्रवीण दरेकरांचे कॅमेऱ्यासमोर उद्गार

 • शिवसेना ‘अबतक 56’ ; उद्धव ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार?

 • मुंबईला येताना धावत्या ट्रेनमधून चोरी झाला आमदाराचा मोबाईल; फर्स्ट क्लास कोचमधून करत होते प्रवास

 • Agnipath Scheme : ‘हा सैन्य दलाचा अपमान’, संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

 • मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांची भेट

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Army, Modi government, Protest, Sanjay raut

Leave a Reply

Your email address will not be published.