महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को, आंदोलनाचा VIDEO

मुंबई, 17 जून : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड (Nationa Herald) प्रकरणी ईडीने (ED) समन्स बजावला आहे. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस 30 तास चर्चा करण्यात आली. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या या चौकशीवरुन देशात ठिकठिकाणी आंदोलन (Protest) केले जात आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करण्यात येतोय. देशभरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणे मुंबईतीलही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर ईडीवर (ED) मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. पण काँग्रेसचे ईडीवरील आक्रमक मोर्चाचे सर्व दावे फोल ठरले. महिला काँग्रेसचा ईडीवरील मोर्चाचा फियास्को झाला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. या मोर्चाचा गाजावाजा पाहता पोलीसही सतर्क झाले होते. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण मोर्चाचा ठरवलेला वेळे निघून 2 तास झाले तरी महिला जमेनात. मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्याच जास्त होती. विशेष म्हणजे या मोर्चाकडे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली दिसली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता या आंदोलनात सहभागी झालेलं दिसलं नाही.
VIDEO : महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को, आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त #congress #ed pic.twitter.com/gTHbb1m933
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2022
(‘मॅच संपूदे, मग त्याला बघून घेतो,’ लॉर्ड शार्दुलवर भडकला रोहित शर्मा) मोर्चासाठी महिला जमेनात म्हणून जमलेल्या 20 ते 25 महिलांनी घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी केली. महिला काँग्रेसने ईडी कार्यालयावर घेराव घालणार, असा दावा केला होता. पण सर्व दावे फोल ठरले . महिला प्रदेश काँग्रेस मोर्च्यात सहभागी व्हायला कार्यकर्त्याच नव्हत्या. अखेर असलेल्या महिलांसह घोषणाबाजी करत कार्यकर्त्या निघाल्या. या सर्व आंदोलक महिलांना लगेच पोलिसांनी रोखलं. त्यानंतर मोर्चा आटोपला. महिला काँग्रेसचा मोर्चाचा हा स्टंट अवघ्या 10 मिनिटात आटोपला.
-
‘नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडतंय, काँग्रेस नेतृत्वास विनंती, रुग्णालयात घेऊन जा’, आशिष शेलारांची खोचक टीका
-
गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा विचार बदलला, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय
-
विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
-
हाताची नस कापून मुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल
-
19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण…
-
VIDEO : महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को, आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त
-
विधान परिषदेपाठोपाठ राज्यात आणखी एका निवडणुकीची चर्चा, भाजपचा उमेदवारही ठरला, शिवसेनेला कडवं आव्हान
-
विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं ‘हॉटेल पॉलिटिक्स’
-
नुपूर शर्मांना समन्स, रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस पोहोचले दिल्लीत!
-
विधान परिषद निवडणूक, काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप कामाला, महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलंय?
-
मोठी बातमी, एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून उद्धव ठाकरेंना फोन, कारण…
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.