Home » मुंबई » rajya sabha election : भाजपनेही उघडले खाते, पियूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

rajya sabha election : भाजपनेही उघडले खाते, पियूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

rajya-sabha-election-:-भाजपनेही-उघडले-खाते,-पियूष-गोयल-आणि-अनिल-बोंडे-विजयी

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) महाराष्ट्रामध्ये अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहण्यास मिळालं. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडी सरकारने (mva governmet) भाजपला धोबीपछाड दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाली आहे. हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम, मतदान आणि त्यानंतर भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर मतमोजणीला तब्बल 8 ते 9 तासांचा विलंब झाला. अखेरीस मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. प्राथमिक निकाल हाती आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत  विजयी झाली आहे.  तर काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती.  तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल रिंगणात होते. मतमोजणी अंती तिन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून यांना उमेदवारी दिली होती. पियूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाले आहे. कुणाला किती मतं मिळाली? पियूष गोयल – 48 अनिल बोंडे – 48   संजय राऊत 41 प्रफुल्ल पटेल – 43 इम्रान प्रतापगढी 44 संजय पवार – 33 धनंजय महाडिक – 41 सुहास कांदेंचं मत बाद; आव्हाड, ठाकूर, मुनगंटीवारांची मतदान वैध राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला होता. अखेरीस निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि रात्री उशिरा याबद्दल निर्णय दिला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध्य धरण्यात आले आहे. त्यामुळे मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला. भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवले होते. तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं होतं. पण, आता निवडणूक आयोगाने एकच मत बाद केले.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.