Home » मुंबई » rajya sabha election:फडणवीसांची खेळी यशस्वी, अपक्षांची मतं फुटली;'मविआ'ला धक्का

rajya sabha election:फडणवीसांची खेळी यशस्वी, अपक्षांची मतं फुटली;'मविआ'ला धक्का

rajya-sabha-election:फडणवीसांची-खेळी-यशस्वी,-अपक्षांची-मतं-फुटली;'मविआ'ला-धक्का

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे. भाजपचे संख्याबळ 123 इतकी झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे.  त्यामुळे अपक्षांची 9 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे 41 मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. असा झाला गेम भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता.  त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते  अनिल बोंडे आणि  48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली.  27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात  3 मतं बविआने महाडिक यांना दिली.  1 मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कुणाला किती मतं मिळाली? पियूष गोयल – 48 अनिल बोंडे – 48   संजय राऊत 41 प्रफुल्ल पटेल – 43 इम्रान प्रतापगढी 44 संजय पवार – 33 धनंजय महाडिक – 41 तर, निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती… जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहेत.  तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल  आणि काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहे. सुहास कांदेंचं मत बाद; आव्हाड, ठाकूर, मुनगंटीवारांची मतदान वैध राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला होता. अखेरीस निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि रात्री उशिरा याबद्दल निर्णय दिला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध्य धरण्यात आले आहे. त्यामुळे मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला होता.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.