Home » मुंबई » rajya sabha election : धनजंय महाडिकच कोल्हापूरचे 'पैलवान', संजय पवार पराभूत

rajya sabha election : धनजंय महाडिकच कोल्हापूरचे 'पैलवान', संजय पवार पराभूत

rajya-sabha-election-:-धनजंय-महाडिकच-कोल्हापूरचे-'पैलवान',-संजय-पवार-पराभूत

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) महाराष्ट्रामध्ये मोठे नाट्य पाहण्यास मिळाले आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम, मतदान आणि त्यानंतर भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर मतमोजणीला तब्बल 8 ते 9 तासांचा विलंब झाला. अखेरीस मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.  तर भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे. भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे.  त्यामुळे अपक्षांची 9 ते 10 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती.  तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल रिंगणात होते. मतमोजणी अंती महाविकास आघाडीने तिन्हही जागा जिंकल्या आहेत. सुहास कांदेंचं मत बाद; आव्हाड, ठाकूर, मुनगंटीवारांची मतदान वैध राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला होता. अखेरीस निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि रात्री उशिरा याबद्दल निर्णय दिला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध्य धरण्यात आले आहे. त्यामुळे आता मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवले होते. तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं होतं. पण, आता निवडणूक आयोगाने एकच मत बाद केले.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.