Home » मुंबई » सेनेचे आमदार सुहास कांदेंचं मत का झालं बाद? संजय राऊतांना धक्का बसण्याची शक्यता

सेनेचे आमदार सुहास कांदेंचं मत का झालं बाद? संजय राऊतांना धक्का बसण्याची शक्यता

सेनेचे-आमदार-सुहास-कांदेंचं-मत-का-झालं-बाद?-संजय-राऊतांना-धक्का-बसण्याची-शक्यता

मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) राज्यात मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kandes vote rejected) यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. सुहास कांदे यांचे मत हे संजय राऊत यांना पहिल्या पसंतीला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांचा कोटा जर कमी झाला तर संजय राऊत यांचे एक मत कमी होण्याची शक्यता आहे. मतमोजणीनंतरच मत कुणाचे कमी झाले, हे स्पष्ट होणार आहे. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kandes vote rejected) यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मत वैध धरण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीने भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने  दोघांचेही मत वैध ठरवले आहे. पण, सुहास कांदे यांनी पहिल्या पसंतीचे मत हे संजय राऊत यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मतांच्या कोट्यातील एक मत कमी होण्याची शक्यता आहे. पण, शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच, कांदे यांचं मत बाद होण्याची शक्यताच नाही, त्यामुळे आम्ही कोर्टात धाव घेणार असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. सुहास कांदे यांचं मत का झाले बाद? सुहास कांदे हे मतदान करण्यासाठी आले होते. त्यांनी मतपत्रिका ही क्युबिकलच्या बाहेरून पक्षाच्या एजंटला दाखवली. तेव्हा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना  क्युबिकलच्या आत जाण्यास सांगितले होते. तसंच मतपत्रिकेची घडी घालण्याचा सल्ला दिला होता. शिवसेनेच्या पक्ष प्रतोदासह राष्ट्रवादीच्या एजंट यांनाही मतपत्रिका दाखवली.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.