Home » मुंबई » भाजपचं पत्र, राज्यसभेची मतमोजणी रखडली, मविआची धाकधूक वाढली

भाजपचं पत्र, राज्यसभेची मतमोजणी रखडली, मविआची धाकधूक वाढली

भाजपचं-पत्र,-राज्यसभेची-मतमोजणी-रखडली,-मविआची-धाकधूक-वाढली

मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकास रखडला आहे. सर्व आमदारांच्या मतदानानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणं अपेक्षित होतं. सव्वा तास उलटून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे मतमोजणी का रखडली? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने आज झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. भाजपने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या हरकतींवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या पत्राची दखल घेतल्याचं मानलं जात आहे. भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवत आपला आक्षेप नोंदवला आहे. तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं आहे. या पत्रामुळे मतमोजणी रखडली आहे. विशेष म्हणजे मतदानावार हरकत ही महाविकास आघाडीकडूनही घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. (शिवसेनेला MIM आणि सपाची पावर, संजय पवारांच्या विजयाचं नेमकं गणित काय?) दरम्यान, महाविकास आघाडीकडून मुनगंटीवार यांच्या मतावर घेण्यात आलेल्या आक्षेपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. “त्यांचा आरोप, त्यांची उद्विग्नता हेच दाखवून देत आहे. त्यांच्या देहबोलीतूनच त्यांचा पराभव दिसत आहे. आम्ही उतावील आणि आततायीपणा नाही. अतिशय संयमीपणे आम्ही निवडणूक लढलो आहोत. कारण निवडणुकीच्या निकालापर्यंतच थयथयाट राहणार आहे. ज्यावेळेला आमचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक जिंकून येणार त्यावेळी यांची बोलती बंद होईल”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. भाजपने पाठवलेलं पत्र जसंच्या तसं “मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग, निर्वचन सदन, अशोक रोड, नवी दिल्ली-110001 विषय: 10 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेचे उल्लंघन-मतदान रद्द सर, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की सर्व श्रीमती. यशोमती ठाकूर आमदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे श्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे श्री सुहास कांदे आणि या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींशिवाय इतर व्यक्तींना त्यांची मतपत्रिका उघडपणे दाखवून मतदान प्रक्रियेत तडजोड केली आणि उल्लंघन केले. इतर प्रक्रिया. 2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात आयोगाने अशा अटी ठेवल्या होत्या ज्यात निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारे कोणतेही मत मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीच्या वेळी रद्द केले जाईल. या तिन्ही प्रकरणातील आक्षेप भाजप निवडणूक एजंट व इतरांनी रिटर्निंग ऑफिसरकडे दाखल केले होते. आरओने सादर केलेल्या तथ्यांचा विचार न करता किंवा निवडणूक नियम 1961 च्या वर्तनाची तपासणी न करता, मतदान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पक्षाच्या प्रतिनिधींनी भारत निवडणूक आयोगाकडे निवेदने सादर केली. [त्याच्या प्रती संलग्न आहेत.] वरील बाबी लक्षात घेता, अहमद पटेल 2017 प्रकरणात, आम्ही आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि निवडणूक नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करणारी मते रद्द करण्याची तसेच आयोगाच्या आदेशानुसार निकाली काढण्याची विनंती करतो.”

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.