Home » मुंबई » मुंबईत 'हे' दृश्य दिसलं आणि धनंजय मुंडेंना व्हावं लागलं फोटोग्राफर

मुंबईत 'हे' दृश्य दिसलं आणि धनंजय मुंडेंना व्हावं लागलं फोटोग्राफर

मुंबईत-'हे'-दृश्य-दिसलं-आणि-धनंजय-मुंडेंना-व्हावं-लागलं-फोटोग्राफर

10 जून, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमख नेत्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे. (NCP Leader Dhananjay Munde) वक्तृत्वाचे धनी असलेल्या धनजंय मुंडेंकडे महाराष्ट्राचे भविष्यातील मुख्यमंत्र्यांपैकी एक दावेदार म्हणूनही पाहिले जाते. हेच राजकारणात असलेले धनंजय मुंडे आता फोटोग्राफरच्या (Dhananjay Munde as Photographer) भूमिकेत दिसले आहेत. नेमकं काय घडलं – राजकारण म्हटलं की त्यात राजकारणी माणसाचं वेळापत्रक हे अत्यंत व्यस्त असतं. त्यात मंत्रीपदावर जर व्यक्ती असेल तर आणखीनच व्यस्त. मात्र, इतकी व्यस्तता असूनदेखील महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे एका वेगळ्याच फोटो भूमिकेत पाहायला मिळाले. धनंजय मुंडे हा चक्क फोटोग्राफरच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. त्यांनी एक फोटो काढतानाचा स्वत:चा फोटोदेखील ट्विट केला आहे. ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी काय लिहिलंय – “हमी ट्रॅफिक आणि घाई-गर्दीच्या विळख्यात असलेल्या मुंबई शहराचे कालच्या हलक्या पावसानंतर सुंदर रूप आज पाहायला मिळाले. स्वच्छ निरभ्र आकाश, शांत सागर आणि उंच-उंच इमारती… हे मोहक रूप पाहून फोटो काढायचा मोह आवरता आला नाही!”, असे ट्विट करत त्यांनी सुंदर असे फोटोही ट्विटरवर टाकले आहेत. हेही वाचा – Rajya Sabha Election: “जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते बाद करा” भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला

नेहमी ट्रॅफिक आणि घाई-गर्दीच्या विळख्यात असलेल्या मुंबई शहराचे कालच्या हलक्या पावसानंतर सुंदर रूप आज पाहायला मिळाले. स्वच्छ निरभ्र आकाश, शांत सागर आणि उंच-उंच इमारती… हे मोहक रूप पाहून फोटो काढायचा मोह आवरता आला नाही! pic.twitter.com/V1sfI9cSVA

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 10, 2022

काल मुंबईत हलका पाऊस झाला होता. या हलक्या पावसानंतर आकाशाचे रुप फार निरभ्र असे दिसत होते. हे निरभ्र आकाश, शांत सागर पाहून मंत्री धनंजय मुंडे यांनाही फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. त्यांनी या दृश्याचा फोटो काढत आपल्या टि्वटर अकाऊंटवर ट्विट केला आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Dhananjay munde, Photography

Leave a Reply

Your email address will not be published.