Home » मुंबई » 'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही', देवेंद्र फडणवीस गरजले

'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही', देवेंद्र फडणवीस गरजले

'तुमच्या-सत्तेचा-ढाचा-पाडल्याशिवाय-राहणार-नाही',-देवेंद्र-फडणवीस-गरजले

मुंबई, १५ मे – ‘बाबरी (babari) पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ किलो होतं. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं वजन कमी कराल. लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही पातळी सोडली आहे मात्र मी अजून ही पातळी सोडून बोलत नाही’अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis speech) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्यावर जोरदार टीका केली. भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. ‘जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार. मी जेव्हा म्हणालो रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली? अरे मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी मस्जिद गिरा रहा था, तुझे मिरची लगी तो मै क्या करु? अरे हा, मी बाबरी पाडण्याकरता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. उद्धवजी 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता’अशी टीका फडणवीस यांनी केली. (watermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, शेतकरी मात्र बेहाल!) छत्रपती संभाजी राजांना औरंगाजेबाने मारले, औरंगजेब संभाजींना फक्त धर्म बदलायला सांगत होता. पण संभाजींनी धर्म बदलला नाही. संभाजी राजांनी जीव गेला तरी स्वराज्य आणि स्वधर्म देणार नाही, असं सांगितलं. संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर तो असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे लाजा बाळगा, बघता काय? ग्लासभर पाण्यात डुबकी मारा. औवेसी ऐकून घे औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार, असंही फडणवीस म्हणाले.

 • Accident : अलिबागला फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू, 5 गंभीर

 • Cannes 2022: अमृता फडणवीस पोहोचल्या कान्स महोत्सवात, शेअर केला फोटो

 • Rajya Sabha election : संभाजीराजेंचा आदर आहे, पण…, संजय राऊत स्पष्टच बोलले

 • ‘कोणालाच आरक्षण देऊ नका’, ब्राह्मण संघटनेच्या या मागणीवर पवारांचे सडेतोड उत्तर, म्हणाले…

 • Rajya Sabha: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोणाला उमेदवारी? वर्षा बंगल्यावर खलबतं; मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

 • “काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

 • मोठी बातमी : राणा दाम्पत्याला झटका, मुंबईतल्या घरातील बांधकाम अनधिकृतच, घरावर चालणार BMC चा हातोडा

 • Rajya Sabha election : राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’, सेनेकडून सलग चौथ्यांदा संधी; 26 मे रोजी भरणार अर्ज

 • Rajya Sabha Election: संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, सोमवारपर्यंत निर्णय न कळवल्यास शिवसेना दुसरा उमेदवार देणार

 • Video : चालत्या ट्रकने घेतला पेट; नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

 • Nawab Malik: नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांचे डी-गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे – कोर्टाचं निरीक्षण

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.