Home » मुंबई » BREAKING : राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

BREAKING : राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

breaking-:-राज-ठाकरेंच्या-घराबाहेर-मनसैनिकांची-गर्दी,-पोलिसांनी-वाढवला-बंदोबस्त

मुंबई, 03 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादेतील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरू झाले आहे. मुंबईतील राज ठाकरे (raj thackeray new house shivtirth) यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे अधिकारीही राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ असलेल्या निवासस्थानी शिवतीर्थावर (कसं शक्य आहे? माणसाच्या स्पर्शाने ‘मृत’ झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO) कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली आहे. राज ठाकरेंना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते गोळा होत आहे. राज ठाकरे मात्र घरीच आहे.  कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे. तर शर्मिला ठाकरे यांनी खाली येऊन कार्यकर्त्यांसोबत काही मिनिटं संवाद साधला. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे दाखल झाले आहे.  गर्दी वाढल्यानं  पाहणी करण्यासाठी आल्याचं कसबे यांनी खुलासा केला आहे.  नोटीस देण्याबाबत कोणत्याही सूचना नसल्याचं कसबे यांनी दावा केला आहे. तर शिवाजी पार्क परिसरात बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे. राज ठाकरेंवर होणार कारवाई दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 मे पासून मशिदींसमोर भोंगे लावण्यात येईतल असा स्पष्टच इशारा दिला. औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) राज ठाकरेंच्या सभेला अटी-शर्थींसह परवानगी दिली. या सभेत राज ठाकरेंनी नियमांचं उल्लंघन केलं आहे का? याबाबत औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. त्याच दरम्यान आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Maharashtra DGP Rajnish Seth) यांनी एक मोठं विधान केलं आहे. (…म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू, गृहराज्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट) राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.