Home » मुंबई » राज्यात बाहेरून गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यात बाहेरून गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यात-बाहेरून-गुंड-आणून-मुंबईत-गडबड-करण्याचा-डाव,-संजय-राऊतांचा-गंभीर-आरोप

मुंबई, 3 मे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत? राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. आमच्यावरही झाले आहेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात. राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्यांची ताकद नाही, ते लोक करत आहोत. शेवटी सुपारीचे राजकारण आहे. मात्र, या सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यावर लक्ष आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावल्या जातील, असा स्पष्टच इशारा दिला. याबद्दल खासदार संजय राऊत म्हणाले की, अल्टीमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा, नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ती सर्वात मोठी चूक ठरेल व ते स्वत: एक्सोपज होतील. राज्याच्या पोलिसांची पाऊले योग्य दिशेने पडत आहेत. तसेच अयोध्या दौऱ्याची आखणी सुरू आहे, असेही खासदार राऊत म्हणाले. हेही वाचा – कुठे जमावबंदी तर कुठे दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना; ईदच्या दिवशी देशभरात तणावाचं वातावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना –

मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेची डेडलाईन दिली आहे. पण आता महाराष्ट्र पोलीस राज ठाकरेंच्या विधानावर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरील व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.