मुंबई गारठली, हंगामातील सर्वात थंडी, तुमच्या शहरात असा असेल अंदाज

मुंबई-गारठली,-हंगामातील-सर्वात-थंडी,-तुमच्या-शहरात-असा-असेल-अंदाज

मुंबई, 25 डिसेंबर : राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी पावसाचे सावट असल्याने थंडी कमी झाली होती. दरम्यान आता थंडीची चाहुल लागली आहे. मुंबई आणि उपनगरात तापमानात कमालीची घट झाली आहे. मागच्या 24 तासांता मुंबई आणि उपनगरात 18 अंश सेल्सिअस तापमानात नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या हिल स्टेशनपेक्षा फक्त एक अंश जास्त तापमान मुंबईसारख्या भागात नोंद झाली असल्याची माहिती कुलाबा हवामान केंद्राकडून देण्यात आली. मुंबईत किमान तापमान 18.8अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

मागच्या वर्षी 29 डिसेंबरला किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. शनिवारी मुंबई महानगर प्रदेशातील इतर शहरांच्या तुलनेत उपनगरात थंडी वाढली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मागच्या 24 तासांत 17.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कोल्हापूर (17.4) आणि रत्नागिरी (19.2) तापमानाची नोंद झाली. दरम्यान मुंबईकरांनाही मागच्या 24 तासांत दिवसा कमाल तापमान 28.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उन्हाच्या झळांपासून सुटका झाली होती.

हे ही वाचा : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अ‍ॅप आता नव्या रुपात

उत्तर भारतातील बहुतांश राज्यात दाट धुके आणि तीव्र थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी, शुक्रवारपेक्षा शनिवारी राज्यातील किमान तापमानात घट होऊन किंचित थंडी वाढली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागात कडाक्याची थंडी पडली असून, या भागातील किमान तापमानाचा पारा 10.3 अंशांंपर्यंत घसरला आहे.

पुणे आणि परिसरातदेखील रात्रीच्या थंडीत वाढ होऊन किमान तापमान 11.6 अंशांवर आला आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात किमान तापमानाच्या सरासरीच्या आसपास राहिले आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतात शीतलहर मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम ओडिशा,आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी, तसेच दाट धुके पसरले आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा आता श्रीलंकेकडे सरकला आहे. तसेच, या पट्ट्याची तीव्र ता कमी झाली आहे. 

हे ही वाचा : पुणे, औरंगाबादमध्ये थंडी वाढली, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

त्यामुळे आता उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे हळूहळू वाहू लागले आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी राज्यातील नाशिक भागाचे किमान तापमान कमी होऊन थंडीची तीव्रता वाढली आहे. उर्वरित राज्यात मात्र किमान तापमान सरासरीच्या आसपास राहणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *