मुंबईत मुलानेच केली प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या; मृतदेह बॉक्समधून जंगलात फेकला

मुंबईत-मुलानेच-केली-प्रसिद्ध-अभिनेत्रीची-हत्या;-मृतदेह-बॉक्समधून-जंगलात-फेकला

मुंबई, 10 डिसेंबर :  मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वीणा कपूरबाबत ही धक्कादायक बातमी आहे. वीणा कपूरच्या मुलाने तिची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.  74 वर्षीय वीणा कपूरची हत्या तिच्या स्वतःच्या 43 वर्षीय आरोपी मुलाने केली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती तिची सहअभिनेत्री नीतू कोहलीने दिली आहे. यामागचं कारण ऐकूनही तुम्हाला मोठा धक्का बसेल.

वीणा कपूर यांना बॅटने मारहाण करुन त्यांच्या मुलाने खूण केला. जमिनीच्या वादातून मुलाने आपल्या 74 वर्षीय आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर 43 वर्षीय आरोपी मुलाने पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह माथेरानमध्ये फेकून दिला.पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख सचिन कपूर म्हणून केली आहे. सचिन त्याची आई वीणा कपूरविरुद्ध कोर्टात खटला लढत असल्याचे सांगण्यात आले. मालमत्तेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी घरचा नोकर लालू कुमार मंडल यालाही अटक केली आहे.

हेही वाचा – Salman Khan पुन्हा एकदा प्रेमात; ‘या’ साऊथ सुंदरीला करतोय डेट?

‘मेरी भाभी’ सीरियल फेम वीणा कपूरच्या निधनाची माहिती तिची सह-अभिनेत्री नीतू कोहलीने इंस्टाग्रामवर दिली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं, ‘वीणाजी तुम्ही यापेक्षा चांगलं डिजर्व्ह करत होतात. माझे हृदय तुटले आहे, तुमच्यासाठी ही पोस्ट करत आहे, काय सांगू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे की इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्ही शेवटी शांततेत आहात. जुहू येथील हा तो बंगला आहे जिथे ही दुःखद घटना घडली. या पॉश जुहू परिसरात एका व्यक्तीने आपल्या 74 वर्षीय आईची बेसबॉल बॅटने हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह माथेरानमध्ये फेकून दिला. त्यांच्या अमेरिकेतील मुलाला संशय आला आणि त्याने जुहू पोलिसांना सूचना दिली.’

नीतू यांनी पुढे लिहिलं, ‘चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने रागाच्या भरात आईच्या डोक्यावर बेसबॉलच्या बॅटने अनेक वार केल्यानंतर तिची हत्या केली.’  मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पॉश जुहू भागात 12 कोटी रुपयांच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी आरोपी मुलाने आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने मृतदेह एका रेफ्रिजरेटर बॉक्समध्ये लपवून मुंबईपासून 90 किमी अंतरावर असलेल्या माथेरानच्या जंगलात फेकून दिला.

दरम्यान, या बातमीमुळे मनोरंजनसृष्टीवर मोठी शोककळी पसरली आहे. वीणा यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे अनेकांना धक्काच बसला असून त्यांचे चाहतेही सदम्यात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *