मुंबईत पाऊस तर राज्यात अन्य ठिकाणी थंडीचा चाहुल, चक्रीवादळाचा अद्यापही परिणाम

मुंबईत-पाऊस-तर-राज्यात-अन्य-ठिकाणी-थंडीचा-चाहुल,-चक्रीवादळाचा-अद्यापही-परिणाम

मुंबई, 15 डिसेंबर : राज्यात मेंडोस वादळामुळे मागचे चार दिवस काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्तिथी निर्माण झाली होती. दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात आहे. राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणात बदल होऊन थंडीची चाहुल लागण्याची शक्यता आहे. आजपासून (ता.15) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे ही वाचा : पिकांवर आलंय नवीन भयंकर संकट, रात्रीत होतोय हल्ला Video

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असून, राजस्थानमधील चुरू येथे बुधवारी (ता. 14) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 16.5 अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान 16 ते 26 अंशांच्या दरम्यान होते.

Mumbai weather 15 Dec Min Temp CLB 25.2 °C SCZ 24.4 °C -IMD MUMBAI

Partly cloudy.Light drizzle in city yesterday late night.Cloudy weather as a effect of deep depression in Arabian Sea. No threat to city or west coast.Fishermen warnings & high wind warnings over sea cont — K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 15, 2022

दरम्यान राज्यात काही ठिकाणी अद्यापही मेंडोस वादळाचा परिणाम होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. काल (ता.14) राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण कायम होते. आज (ता. 15) पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : दूध दरवाढीनंतरही शेतकऱ्यांचे हाल कायम, उत्पादकांची परिस्थिती ‘जैसे थे’

पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात आहे. तर दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटांजवळ समुद्र सपाटीपासून 5.8किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. 15) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

मागच्या 24 तासांतील तापमान

राज्या मागच्या 24 तासांत कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 28.2 (18.2), जळगाव 31.6 (21.7), धुळे 32 (19), कोल्हापूर 26.8 (21), महाबळेश्वर 20.6(16.5), नाशिक 29.7 (20.8), निफाड 29.8 (21.5), सांगली 28.2 (21.3), सातारा 25.8 (16.1), सोलापूर 31.2 (20.5), सांताक्रूझ 34.5 (25.6), डहाणू 34.3 (24.3), रत्नागिरी 34.5 (25.8), औरंगाबाद 29.2 (18), नांदेड 30.8 (21.2), उस्मानाबाद 29.6 (19), परभणी 30.2(20.6), अकोला 31.8 (22.6), अमरावती 29 (20.3), बुलडाणा 28.8 (21.4), चंद्रपूर 30 (20.8).

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *