'मी प्रेम आणि शारिरीक संबंध…'; आशिकी गर्ल अनु अग्रवालचं ते वक्तव्य चर्चेत

मुंबई, 30 डिसेंबर : ‘आशिकी गर्ल’ म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनु अग्रवाल आता 53 वर्षांची झाली आहे. एका अपघातानं तिचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. त्यानंतर ती इंडस्ट्रीपासूनही दूर गेली. अपघातामुळे तिचा चेहरा खूपच बदलून गेला ज्यामुळे तिला ओळखणंही खूप कठिण झालं. अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिनं प्रेम आणि सेक्सविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनु अग्रवालच्या वक्तव्याची चर्चा पहायला मिळतेय.
अभिनेत्री अनु अग्रवाल अपघातानंतर एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते. गेल्या काही काळापासून ग्लॅमरस जगापासून दूर असलेल्या अनु अग्रवालने प्रेम आणि सेक्सविषयी एका मुलाखतीत सांगितंल, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या शारिरीक गरजा खूप आधीच संपल्या आहेत. मला एनजीओच्या मुलांपासून खूप प्रेम मिळतं. हे प्रेम खूप पवित्र आणि निरागस आहे. त्यामुळे आता प्रेमाची परिभाषा बदलली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रेम मिळतं. त्यामुळे सेक्स आणि प्रेम या गोष्टींना मी सारखं नाही समजत.’
हेही वाचा – Malaika Arora : दुसऱ्या लग्नासाठी का तयार झाली मलायका अरोरा? अर्जुन नाही तर हे आहे कारण
1999 मध्ये अनुचा कार अपघात झाला होता. त्यानंतर ती 29 दिवस कोमामध्ये होती. अपघातानंतर तिचं करिअर संपल्यासारखंच झालं. त्यामुळे ती पडद्यापासून दूरावली. सध्या ती मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते. मागेच ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती. मात्र तिचे काही सीन यामधून डिलीट केल्याचा आरोप तिने केल्या होता. त्यामुळे इंडियन आयडल शो चांगलाच ट्रोल होत होता. यामुळे अनु चांगलीच चर्चेत आली होती.
दरम्यान, अनुचा जन्म 11 जानेवारी 1969 रोजी नवी दिल्लीत झाला होता आणि तिचे पालनपोषणही दिल्लीतच झाले होते. ती दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्रात सुवर्णपदक विजेती होती. मॉडेलिंगनंतर तिने 1990 मध्ये महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर इंडस्ट्रीत तिची मागणी खूप वाढली होती. या चित्रपटानंतर तिला सर्वजण ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखू लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.