मी देशद्रोही तर पंतप्रधान मोदी कोण? त्या घटनेवरून राऊतांचा बोम्मईंना सवाल

मी-देशद्रोही-तर-पंतप्रधान-मोदी-कोण?-त्या-घटनेवरून-राऊतांचा-बोम्मईंना-सवाल

मुंबई, 23 डिसेंबर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांना देशद्रोही म्हटले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. बोम्मई जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादमध्ये बोलवून, झोपाळ्यावर बसवून, पापडी गाठ्या खाऊ घालणाऱ्यांना काय म्हणणार असे म्हणत राऊत यांनी बोम्मईंसोबत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राऊत पुढे काय म्हणाले, बोम्मई जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादमध्ये बोलवून, झोपाळ्यावर बसवून, पापडी गाठ्या खाऊ घालणाऱ्यांना काय म्हणणार असे राऊत म्हणाले. आम्हाला बेसावध ठेवून कर्नाटक घुसखोरी करतोय. हे चीन सारखंच करताहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात तेल आणि आग लावण्याचे काम बोम्मई करताहेत. ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढताहेत. असेही राऊत म्हणाले.

हे ही वाचा : भुखंडावरून शिंदेंना अडचणीत कोण आणतंय? फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी सांगितली Inside Story

ते पुढे म्हणाले की, बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची तोंडं बंद आहेत. हे १२ कोटी लोकांचे दुर्देव आहे. कर्नाटक विधानसभेनं काल निषेध ठराव मंजूर केला त्याची माहिती राज्य सरकारला माहिती नाही. कर्नाटक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वाद नाही. हा वाद बोम्मई नी सुरू केलाय. तुम्हाला घटनात्मक अधिकार आहे मग आम्हाला नाही का ? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई काय म्हणाले

सीमावादावर टीका करत कर्नाटक विधानसभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला, तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. दरम्यान, बोम्मई म्हणाले, ‘मी संजय राऊतना चीनचा एजंट म्हणेन. संजय राऊत हे देशद्रोही आहेत. या संघराज्य व्यवस्थेत, जर कोणी म्हणत असेल की तो बेकायदेशीरपणे दुसऱ्या राज्यात प्रवेश करू, तर याचा अर्थ तो या व्यवस्थेसह देशाची एकता आणि अखंडता नष्ट करण्याचा विचार करत आहेत.

हे ही वाचा : Live Update: भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा; त्या प्रकरणात क्लीन चीट

बोम्मई पुढे म्हणाले, संजय राऊतना देशद्रोही शिवाय दुसरे काय म्हणायचे? अशा वाईट गोष्टी बोलणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देणार नाही. जर ते चीनप्रमाणे घुसले तर आम्ही त्यांनाही भारतीय सैनिकांप्रमाणे हुसकावून लावू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *