मी त्यांच्याकडे गेले अन् त्यांनी मला…; नीना गुप्तांनी सांगितला तो कठीण प्रसंग

मुंबई, 29 डिसेंबर : अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफच्या चर्चा सर्वाधिक झाल्या. नीना गुप्ता बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री होती जी नेहमीच काळानुसार स्वत:मध्ये बदल करत होती. सिनेमांपासून आता ओटीटी माध्यमांवरही नीना गुप्ता यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. नीना गुप्ता यांची लाईफ स्टोरी सर्वांना माहिती आहे. सिंगल पॅरेंट होऊन त्यांनी मुलीला सांभाळलं. मोठ्या प्रमाणात टीका होत असताना त्यांनी आपलं करिअर घडवलं. नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी आजवर समोर आल्या आहेत. अनेकदा त्यांनी स्वत: मनमोकळेपणानं सांगितल्या आहेत. अशात नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला जो ऐकून सगळेच हैराण झालेत.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतल्यापासूनच त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये देखील अनेक चढ उतार पाहायला मिळाले. 1980च्या दशकात त्या एका सिनेमासाठी काम करत होत्या. सिनेमात त्यांची भूमिका ही फार छोटी होती. पण शुटींगवेळी नीना गुप्ता यांना दिग्दर्शकानं आई बहिणीवरून शिव्या दिल्याचा खुलासा त्यांनी केलाय. नेमकं काय झालं त्यादिवशी याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा – मसाबाने शेअर केला आई-वडिलांबरोबरचा Unseen Photo; ‘वेगळ्या’ फॅमिलीबद्दल लिहिलेली भावनिक पोस्टही व्हायरल
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘नीना 1980मध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्याची पद्धत फार वेगळी होती. आजसारखी मोकळीक नव्हती. सेटवरचं वातावरण फार भयानक होतं. आजसारखी मज्जा मस्ती सेटवर कधीच पाहायला मिळालं नाही’.
त्या काळात बॉलिवूडमध्ये काम करत असताना वाईट अनुभव आला का असा प्रश्न विचारला असता नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मी एक सिनेमा करत होते. त्यात माझी भूमिका फार छोटी होती. एका सीनमध्ये फक्त 2-3 डायलॉग होते. शुटींगच्या दिवशी त्या डायलॉगमधल्या ओळी कापल्या. त्यानंतर माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं. फक्त ती भूमिका पाहिली होती’.
हेही वाचा – ‘या’ फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? वयाच्या 63 व्या वर्षीही करतेय अभिनय
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ‘या प्रकारानंतर मी दिग्दर्शकाकडे गेले. त्यांना म्हटलं, माझ्याकडे फक्त दोन ओळी होत्या आणि तुम्ही त्याही कापल्या. माझं म्हणणं ऐकून त्यांनी पुढच्या शब्दाला थेट आई बहिणीवरून शिव्या घालण्यास सुरूवात केली. तेव्हा सेटवर विनोद खन्ना, जुही चावला हे कलाकारही होती. मला काही कळलं नाही. मला तिथे रडू कोसळलं. त्यांनी मला सगळ्यांसमोर शिव्या दिल्या याचं मला सर्वाधिक वाईट वाटलं होतं’.
‘मला नाही वाटतं की आता बॉलिवूडमध्ये असं होतं असेल. आताचं कल्चर बदललं आहे. आज कोणी आई बहिणींवरून शिव्या नाही देत’, असं नीना गुप्ता पुढे म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.