'मी तुझ्या प्रेमात…' बिग बॉसच्या घरात रितेशनं जिनिलियाला करणार हटके प्रपोज

मुंबई, 25 डिसेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त्र शो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. आता या आठवड्याच्या चावडीवर महेश सर पूर्ण आठवड्याचा हिशोब मांडणार आहेत. पण आज स्पर्धकांना एक खास सरप्राईज मिळणार आहे.
आज बिग बॉसच्या घरात रितेश आणि जिनिलिया देशमुख येणार आहेत. या दोघांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलिया बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहेत. बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये हे दोघेही जण स्पर्धकांसोबत धमाल करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा – BBM4: बिग बॉस मराठीच्या विजेत्याला मिळणार इतक्या लाखांचं बक्षीस; समोर आली खरी रक्कम
बिग बॉसचा एकी प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये रितेश जिनिलियाची लव्हस्टोरी रंगणार आहे. राखी या दोघांना विचारते कि पाहिलं प्रपोज तुम्हाला कोणी केलं. त्यावर जिनिलिया म्हणते आता या ठिकाणी मला प्रपोजल पाहिजे. तिचं म्हणणं ऐकत रितेश खास त्याच्या स्टाईलने जिनिलियाला प्रपोज करताना दिसून येणार आहे. याचबरोबर दोघे ‘वेड लावलंय’ या गाण्यावर स्पर्धकांसोबत थिरकताना देखील दिसणार आहेत.
दरम्यान या आठवड्याच्या चावडीवर घरातील स्पर्धकांच्या आठवड्याचा कामाचा हिशेब महेश सर मांडणार आहेत. महेश सरानी प्रसादला खडे बोल सुनावले आहेत. या आठवड्यात यंदाच्या सीझनमधलं शेवटचं कॅप्टन्सी टास्क पार पडलं. यामध्ये आरोह वेलणकर जिंकला असला तरी बिग बॉसच्या होणाऱ्या विजेत्याचं मात्र चांगलंच नुकसान होणार आहे. स्पर्धकांना कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. पण यातच प्रसाद जवादे मुळे बक्षिसाची रक्कम अर्ध्यावरच आली.
यासोबतच आता उरलेल्या स्पर्धकांपैकी यंदाच्या सीझनचा विनर कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यासोबतच आज एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. तो कोण असेल हे बघणं देखील महत्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.