कोल्हापूर
आज १९ फेब्रुवारी या दिवशी अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ व्या जयंतीनिमीत्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजनाचा कार्यक्रम ग्रोबझ व बहुजन पत्रकार संघ कोल्हापुर यांचे वतीने आयोजित केला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्या वतीने राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष महंमदयासिन शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजीक बांधिलकी म्हणुन कु. सिद्धी मोहन कांबळे, रा. आडुळ, ता.करवीर या११ वर्षाच्या छोटया मुलीस ब्लड कॅन्सरचे निदान झाले.त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले. तिच्या उपचाराचा खर्च भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला. या छोट्याश्या मुलीच्या उपचारासाठी रु.५००० चा मदतीचा धनादेश तसेच जी लागेल ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.ग्रोबझ व पत्रकार संघ यांच्या संयुक्त सहकार्यातुन मदतनिधीचा धनादेश सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांना सुपुर्त करण्यात आला.
या शिवजयंती कार्यक्रमप्रसंगी
कोरोना व समाज सेवेसाठी महंमदयासिन शेख यांचा श्रीकृष्ण कडकधोंड शाहूपुरी पोलीस निरीक्षण यांच्या कडून विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कोल्हापुर मधील मान्यवर व्यक्ती
समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे,
निवृत्त आर.टी.ओ. पी.डी.सावंत
पोलिस निरिक्षक,श्रीकृष्ण कटकधोंड
ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड.धनंजय पठाडे,विश्वास कोळी (सी.एम.डी.ग्रोबझ)
जेष्ठ ऍड परवेजभाई खान,पत्रकार संघांचे अध्यक्ष रवी कोल्हटकर उपाध्यक्ष मुबारक अत्तार उपस्थित होते.