माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी. के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 साड्यांचे वाटप

सोलापूर

 

सोलापूर : ( रतन डोळे)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनामध्ये त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती बहुजनांची माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी.के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, प्रभागाचे युवा नेते रवी थोरात,युवा पँथर चे दीपक गवळी बी.आर.प्रतिष्ठानचे प्रमुख हिरामणी रोकडे ,प्रभागाचे आरोग्य निरीक्षक लोखंडे ,जमादार प्रकाश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी सी. के कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना साड्या वाटण्याचा कार्यक्रम घेतला याचे समाधान होत आहे.कामगार नेते बापूसाहेब सदाफुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माता रमाईचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर बहुजनातील महिलांनी अंधश्रद्धा दूर करून आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण द्यावे हीच खरी 123 मी जयंती म्हणून वंदन करावे.यावेळी रवी थोरात ,दीपक गवळी या मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून 123 वी जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी.के ग्रुपचे आशिष दिलपाक, सुमित मस्के, बंटी ओव्हाळ,आर.के.चंदनशिवे,अजित कांबळे ,आदित्य कदम,अजय मैंदर्गिकर, समर्थ वाघमारे ,सत्यपाल भांगे, सौरभ कांबळे, प्रफुल वाघमारे, अनिश दिलपाक ,अर्बाज नदाफ, फिरोज पठाण ,यश सावंत यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *