माणसांपेक्षाही धूमधडाक्यात श्वानांचं लग्न; नवी मुंबईतील अनोख्या लग्नाचा VIDEO

माणसांपेक्षाही-धूमधडाक्यात-श्वानांचं-लग्न;-नवी-मुंबईतील-अनोख्या-लग्नाचा-video

नवी मुंबई, 25 जानेवारी : एखादं लग्न म्हटलं की त्यात हळदीचा समारंभ, पाहुण्यांचे स्वागत, संगीत, नवऱ्याची एन्ट्री, लग्नसोहळा आणि नंतर पाठवणी अशा सर्व प्रथा पाहायला मिळतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका श्वानाने पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न केले तर तुमचा यावर विश्वास बसेल का? कदाचित नाही… पण हे खरे आहे. नवी मुंबईतील सानपाडा मधील गुनीना लॉन या सोसायटीमध्ये रिओ आणि रिया या श्वानांचा हा विशेष विवाह सोहळा संपन्न झाला आहे. ज्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

निल भाटीया आणि राजेश सिधानी या कुटुंबाच्या श्वानांमध्ये हा विवाह सोहळा रंगला. रिओ आणि रिया एक वर्षांपासून मित्र असून त्यांच्या मालकांनी या दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले. ज्याप्रमाणे लग्नात मंगलअष्टक आणि अंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, तसे विधी या श्वानांच्या लग्नातही पार पडले. एवढंच नाही तर या लग्नासाठी त्यांनी शेजारील लोकांना निमंत्रित देखील केले होते आणि ते सर्वजण लग्नाला हजर होते. लग्न समारंभानंतर यावेळी दोन्ही परिवाराकडून वाजत-गाजत मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात यांची वरातदेखील काढण्यात आली.

हे वाचा – VIDEO – खतरनाक मगरीनेही दाखवली माणुसकी! बुडालेल्या मुलाला पाठीवरून आणत कुटुंबाच्या स्वाधीन केलं

जेव्हा रिओला घेऊन आलो तेव्हा त्याचं लग्न करायचं असा काही विचार नव्हता. मात्र, जेव्हा रिया ही रिओच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांची चांगली मैत्री आणि प्रेम असल्याचं दिसत होत त्यामुळे विचार केला आणि डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या वयानुसार त्यांचं लग्न लावून दिल्याचं दिपा भाटिया यांनी सांगितलं.

रिओ आणि रिया या दोघांचं लग्न हे सर्व सामान्य माणसांचे होते. त्याच पद्धतीनें विधिवध करून दिलं आहे. हळदी, मेहंदी, डान्स, सर्व प्रथा , पंडित मंगलाष्टका या टप्प्याने लग्न लावून देण्यात आलं आहे. या सोहळ्यामुळे आम्ही सर्व आनंदी आहोत, असं भाविषा सिधानी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *